विशेष प्रतिनिधी
सांगली : इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून लढा उभा केला आहे. इस्लामपूर शहरात दररोज विविध आंदोलने यासाठी करण्यात येत आहेत. नामांतराच्या मागणीला शहरातील नागरिकांकडून देखील प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने देखील उडी घेतली आहे. Shiv Pratishthan Yuva Hindusthan jumps in the agitation for naming Islampur as “Ishwarpur”
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण केले होते. पण शासन स्तरावर ईश्वरपूर असे नामकरण झाले नाही. सध्या हे नामांतरण करण्या संदर्भात शिवसेनावतीने आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील जातिवाचक उल्लेख असलेल्या गावांची नावे बदलण्यात यावीत या आनुषंगाने इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर ठेवण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App