१८ हजार कॅसेटचा संग्रह, नामांकित नेत्यांचे आवाज; असलम खान यांनी जोपासला कॅसेट रेकॉर्डिंगचा छंद


विशेष प्रतिनिधी

यवतमाळ : जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषण संदेश, मुलाखत किंवा अन्य कोणतेही संदर्भ तातडीने हवे असल्यास एक कॅसेटची अफलातून लायब्ररी यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील कांदळी गावात आहे. Collection of 18,000 cassettes; The voices of Leadres

असलम खान, असे अवलीया लायब्ररीचे नाव आहे. त्यांच्याकडे जगातील आकाशवाणीवरून प्रसारीत झालेल्या तब्बल अठरा हजारांवर ध्वनीमुद्रिका संग्रहित आहेत. त्यात50 हजार लोकांचा आवाज संग्रही आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जॉन केनेडीपासून ओसामाबिन लादेनचाही आवाज, भाषण संग्रही आहे. बीबीसी लंडन, व्हॉईस ऑफ अमेरिका, व्हॉईस ऑफ जर्मनी, आकाशवाणी मुंबईसह अनेक रेडिओ स्टेशनवरून प्रसारीत झालेल्या जगभरातील नेत्यांच्या भाषणाच्या १८ हजारांवर कॅसेट संग्रहित आहेत.

शिक्षकी पेशातून निवृत्त झालेल्या असलम खान यांनी १९९२ अर्थात तब्बल २९ वर्षांपासून छंद जोपासला असून, आताही अडचणीवर मात करून त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,जॉन केनेडी, नेल्सन मंडेला, महाराणी एलिझाबेथ, राजकुमारी डायना, दलाई लामा, मदर तेरेसा, सद्दाम हुसेन, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी मोठ्या नेते, व्यक्तीमत्त्वांसह ओसामा बिन लादेनसारख्यांच्या भाषणाचा संग्रह आहे. असलम खान यांनी आजपर्यंत हजारो कार्यक्रम कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून ठेवले आहेत.

  • १८ हजार कॅसेटचा संग्रह;नामांकित लोकांचा आवाज
  • जगातील कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचे भाषणे
  • सेवानिवृत्त शिक्षक असलम खान यांचा संग्रह
  • आजपर्यंत हजारो कार्यक्रम कॅसेटमध्ये रेकॉर्ड
  • २९ वर्षांपासून छंद जोपासला

Collection of 18,000 cassettes; The voices of Leadres

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण