विशेष प्रतिनिधी
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १५ वर्षांपूवी कानाखाली वाजवली त्याचा परिणाम म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर दिसून येत आहे. आता महाराष्ट्रात पटापट मराठी बोलली जात आहे. कानाखाली मारली नसती तर दुकानांवर हिंदी – इंग्रजीतच पाट्या असत्या, असे मनसे नेत्या शर्मिला राज ठाकरे यांनी रविवारी सांगितले.Sharmila Thackeray says, 15 years ago Raj Thackeray played under the ear so today Marathi is used everywhere
शर्मीला ठाकरे म्हणाल्या, मराठी भाषेचा अभिमान असायलाच हवा. आम्ही जी आंदोलने केली त्यानंतर मराठी मुलांना नोकऱ्या मिळू लागल्या. मराठी पाट्यांसाठी आंदोलने करावी लागली ही लज्जास्पद गोष्ट आहे. तसेच, यासाठी कानाखाली मारावी लागते,
काचा फोडव्या लागतात आणि हे करताना कार्यकर्त्यांना आनंद होत नाही, आज आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. पण त्याचे फळ म्हणून मराठीचा वापर वाढला आहे. आमच्या आंदोलनानंतर मोबाइल कंपन्यांनी मराठीचा वापर सुरू केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App