विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते खासदार सुप्रिया सुळे राजकारणातील नैतीकतेच्या गप्पा मारत असतात. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा डान्सबारमधली म्हणून निर्लज्ज उल्लेख केला. आता पवार आणि सुप्रिया सुळे त्याच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.Shameless statement of NCP District President Amrita Fadnavis, Sharad Pawar, Supriya Sule will take action?
नवी मुंबईचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा जिल्हाध्यक्ष अशोक गावडे भाषण करत असताना त्याची जीभ घसरली. गावडे म्हणाला, आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले.
मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाºयांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गावडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे निषेध केला आहे. अशोक गावडे यांनी निदर्शने करता अपशब्द वापरले ते तोंडातही घेऊ शकत नाही. नवी मुंबईकरांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सागितले पाहिजे.
उद्या आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणारच आहोत. त्यांच्यावर अनेक गुन्हे असतानाही आज ते नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या काढल्या तर कोणताही पक्ष त्यांना जिल्हाध्यक्ष करू शकत नाही, असे मंदा म्हात्रे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी की करू नये हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही उद्या त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करणार आहोत आणि त्यांना नवी मुंबईतही फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App