पंतप्रधान मोदींनी पुढे येऊन रशिया- युक्रेनचे युध्द थांबवावे, संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा असल्याचे हेमा मालिनी यांचे वक्तव्य


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वत:साठी एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ते जागतिक नेते म्हणून उदयास आले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युध्द मोदीजींनी पुढे येऊन थांबवावे अशी संपूर्ण जगातील नेत्यांची इच्छा आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि प्रसिध्द अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी केली आहे.Hema Malini’s statement that world leaders want PM Modi should come forward and end Russia-Ukraine war

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना त्यांच्या जगातील सर्व नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा उल्लेख केला.



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली.

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, रशियाचे नाटो शी असलेले मतभेद चचेर्तूनच सोडविता येऊ शकतात या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Hema Malini’s statement that world leaders want PM Modi should come forward and end Russia-Ukraine war

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात