नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा


प्रतिनिधी

कोल्हापूर : नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला, असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी केला होता. 11 फेब्रुवारी रोजी घडलेल्या कथित घटनेबाबत संयोगिता राजे यांनी 30 मार्चला सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टनंतर विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. Sambhaji Raje’s support for Sanyogita Raje’s role

काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास यांनी या संदर्भात त्यांची बाजू मांडून खुलासाही केला आहे. आता संभाजीराजे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करून संयोगिता राजेंच्या आरोपांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले संभाजीराजे?

संयोगिताराजे या सत्याची बाजू घेऊन बोलतात. जे पटले नाही, ते परखडपणे सांगतात. नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडला. त्यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

महाराष्ट्र हे फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे राज्य आहे. या महाराष्ट्रात अशी कृत्ये करणारे लोक का निर्माण होतात ते कळत नाही. प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. १०० वर्षांपूर्वी जो त्रास शाहू महाराज आणि इतर महापुरुषांना झाला, तोच प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत, असेही ते म्हणाले.

Sambhaji Raje’s support for Sanyogita Raje’s role

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात