EVERY PIC SAYS SOMETHING: रियाझ भाटी-शरद पवार;रियाझ भाटी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे;रियाझ भाटी-आदित्य ठाकरे;रियाझ भाटी-पृथ्वीराज चव्हाण…कोण आहे गँगस्टर-वाझेचा पंटर रियाझ भाटी?


विशेष प्रतिनिधी

मुंबई:  अंडरवर्ल्ड लिंकपर्यंत जाऊन पोहोचलेलं राजकारण आता चांगलच तापलं आहे.नवाब मलिक यांनी माजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे रियाझ भाटी सोबतचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. मात्र याच रियाझ भाटीचे अन्य फोटो देखील आता समोर आले आहेत. सर्वच प्रमुख पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत या रियाझ भाटीचे फोटो आहेत.Riaz Bhati – Sharad Pawar; Riaz Bhati – Chief Minister Uddhav Thackeray

  • नवाब मलिक यांनी फडणवीस यांचा रियाझसोबतच्या नेमका संबंध काय? असा प्रश्न विचारुन राष्ट्रवादीने रियाझचे भाजप नेत्यांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.
  • त्याच वेळी आता सोशल मीडियावर रियाझ भाटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
  • त्यामुळे आता हा रियाझ भाटी नेमका कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.
  • कोण आहे गँगस्टर रियाज भाटी?
  • रियाज भाटी हा कुख्यात गुंड असून त्याचा दाऊद इब्राहिम टोळीशी थेट संबंध आहे.
  • भाटी यांच्यावर खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे, गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
  • 2015 आणि 2020 मध्ये बनावट पासपोर्टच्या सहाय्याने न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली होती.
  • परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याविरुद्ध जुलैमध्ये गोरेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात भाटी हा सहआरोपी आहे.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझेच्या सांगण्यावरून भाटी हा बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळून वाझेला देत असे.
  • याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने सप्टेंबरमध्ये रद्द केला होता. तेव्हापासून तो फरार असून या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस त्याच्या अटकेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत आहेत.
  • फेब्रुवारी 2020 मध्ये, भाटीला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जामीनासंदर्भातील आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रोखण्यात आलं होतं.
  • यावेळी तो सौदी अरेबियाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी 2015 मध्येही त्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते.
  • त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
  • भाटीला पोलिसांनी 2013 मध्ये अटकही केली होती. तो बनावट पासपोर्टद्वारे पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
    2006 मध्ये त्याच्यावर मालाडमध्ये जमीन हडप आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाऊद इब्राहिम टोळीशी असलेले संबंध वापरून त्याने जमीन ताब्यात घेतली होती.
  • खंडाळ्यातही त्याच्यावर गोळीबार आणि धमकीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

रियाज भाटी सध्या गायब आहे.

  • वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावं समोर आली आहेत त्यामध्ये सुद्धा रियाझ भाटी आहे. रियाझ जर कोठडीत आला तर सत्य बाहेर येईल.

Riaz Bhati – Sharad Pawar; Riaz Bhati – Chief Minister Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात