रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार ; पुण्यात दोघांना अटक ; चढ्यादाराने विक्री


वृत्तसंस्था

पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्या मध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली. पृथ्वीराज मुळीक आणि नर्स नीलिमा घोडेकर यांना पोलिसांनी अटक केली. Remdesivir Injection black market is bursted in pune city ; two persons arrested by police.

गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरात एक जण रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली.



चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

काळाबाजार रोखण्यासाठी संपर्क साधा

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत पोलिसांची दहा विशेष पथके नेमली आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांनी द्यावी,असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.

Remdesivir Injection black market is bursted in pune city ; two persons arrested by police.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात