Big news: India Stops export of remedivir injection

मोठी बातमी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर भारताने घातली बंदी, कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे निर्देश

देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत सरकारने रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाचे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता या इंजेक्शनचा उपयोग केला जातो. देशात कोरोनाचा ग्राफ वाढत असताना अचानक या इंजेक्शनच्या स्टॉकमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. Big news: India Stops export of remedivir injection


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारत सरकारने रेमडेसिव्हिर (Remdesivir) इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. कोरोनाचे मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता या इंजेक्शनचा उपयोग केला जातो. देशात कोरोनाचा ग्राफ वाढत असताना अचानक या इंजेक्शनच्या स्टॉकमध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

रेमडेसिव्हिरचे उत्पादन करणाऱ्या देशांतर्गत सर्व कंपन्यांना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या इंजेक्शनच्या साठ्याबाबत, वितरणाबाबत माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. औषध निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना या इंजेक्शनच्या साठ्याची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून या अतिमहत्त्वाच्या इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही.

याशिवाय देशात पुढील काळात या औषधाच्या मागणीत मोठी वाढही होणार आहे. यादृष्टीने केंद्र सरकारने उत्पादक कंपन्यांना या औषधाचे उत्पादन वाढवण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

राज्यात सक्रिय रुग्णसंख्येनुसार होणार रेमडेसिव्हिरचे वाटप

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येतील लक्षणीय वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने रेम्डेसिव्हिर औषधाचे सक्रिय रुग्णसंख्येच्या वाढीचा दहा टक्के दर विचारात घेऊन वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सर्व जिल्हा प्रशासनास शनिवारी (दि. दहा) पाठवलेल्या एका पत्राव्दारे रेम्डेसिव्हिर इंजेक्शनचे वाटप करताना रुग्णालयातील रुग्णांची संख्या विचारात घेऊन सूत्र निश्चित करण्याबाबत काही निर्देश दिले आहेत.

विशेषतः सक्रिय रुग्ण संख्या (अ‍ॅक्टिव्ह केसेस) वाढीचा दहा टक्के दर विचारात घेऊन जिल्हानिहाय औषधांचे वितरण करावे, उपलब्ध झालेल्या रेमडेसिव्हिरचा दहा टक्के साठा आपत्कालीन साठा म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी स्वतःच्या अखत्यारीत ठेवावा. आपल्या जिल्ह्यातील रेम्डेसिव्हिर इंजेक्शन वितरकांनी सक्रिय रुग्ण संख्या विचारात घेऊन संबंधित कंपनीकडे मागणी नोंद करण्याच्या सूचना द्याव्यात, येणार्‍या काळात दर आठवड्यात याचा आढावा घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Big news: India Stops export of remedivir injection

महत्त्वाच्या बातम्या