Sharad Pawar admitted In Breach candy hospital For surgery on his gall bladder

अवघ्या काही दिवसांत शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, गॉल ब्लॅडरवर होणार शस्त्रक्रिया

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. आता त्यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. Sharad Pawar admitted In Breach candy hospital For surgery on his gall bladder


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया पार पडली होती. आता त्यांना पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे शरद पवार यांना 30 मार्च रोजी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयातील खडे हे त्यांच्या पोटदुखीचं कारण असल्याचं तपासणीतून पुढं आलं. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया 31 मार्च रोजी यशस्वी झाली. एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले.

पहिल्या शस्त्रक्रियेनंतरच डॉक्टरांनी त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती तेव्हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आता त्यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

Sharad Pawar admitted In Breach candy hospital For surgery on his gall bladder

महत्त्वाच्या बातम्या