उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती; बलात्कारातील दोषी आमदाराच्या पत्नीची उमेदवारी केली रद्द


वृत्तसंस्था

उन्नाव :  उत्तर प्रदेश भाजपला अखेर उपरती झाली आहे… बलात्कारातील आरोपी आमदार कुलदीप सेनगर याची पत्नी संगीता सेनगर यांना जिल्हा पंचायत निवडणूकीत दिलेली उमेदवारी भाजपने रद्द केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांनी ही घोषणा केली आहे.Candidature of Sangeeta Sengar, wife of former BJP MLA Kuldeep Singh Sengar who is a convict in 2018 Unnao rape case, has been cancelled: UP BJP Chief Swatantra Dev Singh

संगीता सेनगर भाजपाच्या तिकीटीवर जिल्हा पंचायत निवडणूक लढणार असल्याची घोषणा आधी करण्यात आली होती. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचे अध्यक्षपद होते.



संगीता या सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार होत्या. या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला घेरले. याचे परिणाम इतरत्र प्रतिकूल ठरतील, हे पाहून आता भाजपने संगीता सेनगर यांची उमेदवारी रद्द केली आहे.

कुलदीप सेनगर हे भाजपा आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. उत्तर प्रदेश पंचायत निवडणूक चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. १५ एप्रिलपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आङे. २ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जातील.

गेल्यावर्षी भाजपाने पक्षातून बडतर्फ केलेल्या कुलदीप सेनगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात न्यायालयाने सेनगर यांना दोषी ठऱवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

 

१० लाखांचा दंडही ठोठावला होता. यामध्ये आपला कोणताही सहभाग नसल्याचा कुलदीप सेनगर यांचा दावा आहे. २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Candidature of Sangeeta Sengar, wife of former BJP MLA Kuldeep Singh Sengar who is a convict in 2018 Unnao rape case, has been cancelled: UP BJP Chief Swatantra Dev Singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात