सचिन वाझेंचा आणखी एक कारनामा; टीआरपी घोटाळ्यात ३० लाख रूपये लाच घेतल्याचा आरोप; ईडी करणार चौकशी


वृत्तसंस्था

मुंबई :  अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेंचा आणखी एक जुना कारनामा उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यात सचिन वाझेने ३० लाख रूपयांची लाच घेतल्याचा आरोप होतोय. त्याची चौकशी आता ईडी करणार आहे.sachin vaze took bribe of 30 lakhs in connection with TRP scam

टीआरपी घोटाळ्यातही सचिन वाझेंनी 30 लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालयाने आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.‘बार्क’ (BARC) कडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्हना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याची आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ‘सचिन वाझे टोळी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप यापूर्वीच केला होता.

काय आहे टीआरपी घोटाळा…

अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत.

त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत होता, असा आरोप होता. त्याला मुंबई पोलीसांनी टीआरपी घोटाळ्याचे नाव दिले होते.

sachin vaze took bribe of 30 lakhs in connection with TRP scam

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*