वृत्तसंस्था
बशीरहाट दक्षिण – कुचबिहारमधील सीतलाकुचीत निवडणूक हिंसाचाराला आणि चौघांच्या मृत्यूला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जबाबदार असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्याला आज अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Earlier, Didi encouraged youngsters & womento come forward & gherao CAPF. You said & left on your wheelchair. But because of you, 4 people died there
बशीरहाट पश्चिममधील जाहीर सभेत अमित शहा म्हणाले, की ममतादीदी तुम्ही कुचबिहारला आलात. तरूणांना आणि महिलांना सीएपीएचा अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांचा घेराव करायची चिथावणी दिलीत आणि व्हिलचेअरवर बसून निघून गेलात. त्याचा दुष्परिणाम असा झाला की युवकांनी खरेच सीएफीएफ जवानाला घेराव घातला. त्याची रायफल खेचण्याचा प्रयत्न केला.
तुमच्या जमावाने गुंडगिरी केली. त्यातून चौघांना आपले प्राण गमवावे लागलेत. पण दीदी त्याच दिवशी हिंसाचारात भाजपचे कार्यकर्ते आनंद बर्मन यांची गुंड़ांनी हत्या केली त्याबद्दल तुमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नाही आला…!! हे तुमचे राजकारण असेल, पण बंगालची ही राजकीय संस्कृती नाही, असेही अमित शहांनी सुनावले.
Didi is repeatedly saying Amit Shah must resign. Didi when people will ask me to resign then I will. But you must prepare as you will have to resign on May 2: Union Minister & BJP leader Amit Shah in Basirhat Dakshin #WestBengalElections2021 pic.twitter.com/1VVOStfaSE — ANI (@ANI) April 11, 2021
Didi is repeatedly saying Amit Shah must resign. Didi when people will ask me to resign then I will. But you must prepare as you will have to resign on May 2: Union Minister & BJP leader Amit Shah in Basirhat Dakshin #WestBengalElections2021 pic.twitter.com/1VVOStfaSE
— ANI (@ANI) April 11, 2021
अमित शहा पुढे म्हणाले, की ममतादीदी रोज माझा राजीनामा मागत असतात. जनता मागेल तेव्हा मी राजीनामा देईन. पण दीदी तुमच्या राजीनाम्याची वेळ जवळ आली आहे. २ मे रोजी तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल. त्याला पर्याय नाही कारण बंगालच्या जनतेने तुमचा पराभव केलेला असेल.
Earlier, Didi encouraged youngsters & women (in Sitalkuchi) to come forward & gherao CAPF. You said & left on your wheelchair. But because of you, 4 people died there. On the same morning, a BJP worker also died in the constituency: Union Min & BJP leader Amit Shah pic.twitter.com/7s5XFSDNf2 — ANI (@ANI) April 11, 2021
Earlier, Didi encouraged youngsters & women (in Sitalkuchi) to come forward & gherao CAPF. You said & left on your wheelchair. But because of you, 4 people died there. On the same morning, a BJP worker also died in the constituency: Union Min & BJP leader Amit Shah pic.twitter.com/7s5XFSDNf2
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App