दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, २०० दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

Massive fire at furniture market in Delhi's Shastri Park area, 200 shops burnt to ashes

Massive fire at furniture market in Delhi : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. या अग्निकांडात तब्बल 200 दुकाने भस्मसात झाली. असे सांगितले जात आहे की, फर्निचर मार्केटमध्ये रात्री पावणे एकच्या दरम्यान आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 बंब तैनात करण्यात आले. Massive fire at furniture market in Delhi’s Shastri Park area, 200 shops burnt to ashes


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. या अग्निकांडात तब्बल 200 दुकाने भस्मसात झाली. असे सांगितले जात आहे की, फर्निचर मार्केटमध्ये रात्री पावणे एकच्या दरम्यान आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 बंब तैनात करण्यात आले.

तथापि, अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणेपर्यंत फर्निचर मार्केटमधील सुमारे 200 दुकाने जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत एकही जीवितहानी झाली नाही, परंतु व्यापाऱ्यांचे मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार फर्निचर मार्केटमध्ये रात्री 12.30 वाजता आगीची माहिती मिळाली. या मार्केटमध्ये 250 फर्निचर व हार्डवेअरची दुकाने होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 अग्निशमन बंब बोलावण्यात आले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला कठोर परिश्रम घ्यावे लागले. अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेत 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Massive fire at furniture market in Delhi’s Shastri Park area, 200 shops burnt to ashes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात