Corona outbreak in India, 1.52 lakh patients found in one day, highest in Maharashtra

Corona Outbreak In India : कोरोना रुग्णसंख्येचा भारतात विस्फोट, एका दिवसात आढळले 1.52 लाख रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक

Corona Outbreak In India : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशामध्ये हाहाकार उडाला आहे. देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस नवीन विक्रम नोंदवत आहे, ही स्थिती भयंकर आहे. मागच्या 24 तासांत तब्बल दीड लाख रुग्ण आढळल्याने दहशत निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आढळलेली ही सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. Corona outbreak in India, 1.52 lakh patients found in one day, highest in Maharashtra


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे देशामध्ये हाहाकार उडाला आहे. देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस नवीन विक्रम नोंदवत आहे, ही स्थिती भयंकर आहे. मागच्या 24 तासांत तब्बल दीड लाख रुग्ण आढळल्याने दहशत निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या प्रारंभापासून आढळलेली ही सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. त्याआधी एक दिवस म्हणजेच शुक्रवारी एका दिवसात कोरोनाचे 1.45 लाख नवीन रुग्ण आढळले. कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहून, असे दिसते आहे की दुसऱ्या लाटेमुळे लवकरच देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू शकते.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी मागील 24 तासांत भारतात एका दिवसात कोरोना विषाणूचे 1,52,682 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. या कालावधीत मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली असून 24 तासांत सुमारे 834 जण मरण पावले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्रीपर्यंत कोरोनामुळे देशातील बाधित एकूण रुग्णांची संख्या 1,33,58,608 वर पोहोचली आहे.

मागच्या पाच दिवसांतील आकडेवारी

9 एप्रिल 2021 रोजी 1,44,829 नवीन रुग्ण, 773 मृत्यू.
8 एप्रिल 2021 रोजी 1,31,893 नवीन रुग्ण आणि 802 मृत्यू
7 एप्रिल 2021 रोजी 1,26,315 नवीन रुग्ण आणि 684 मृत्यू
6 एप्रिल 2021 रोजी 1,15,269 नवीन रुग्ण, 631 मृत्यू.
5 एप्रिल 2021 रोजी 96,557 नवीन रुग्ण आणि 445 मृत्यू.

महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्या 794 जणांपैकी महाराष्ट्रातील 301, छत्तीसगडमध्ये 91, पंजाबमध्ये 56, कर्नाटकमध्ये 46, गुजरातेत 42, दिल्लीत 39, उत्तर प्रदेशात 36, राजस्थान 32, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूत प्रत्येकी 23 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 22, झारखंडमध्ये 17, आंध्र प्रदेश आणि हरियाणामध्ये 11-11 लोक आहेत. देशात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत एकूण 1,68,436 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी महाराष्ट्रातील 57,329 जण मरण पावले आहेत.

12 राज्यांत एकही मृत्यू नाही

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 24 तासांत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या महामारीमुळे एकही मृत्यू झालेला नाही. या राज्यांमध्ये अंदमान निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे.

Corona outbreak in India, 1.52 lakh patients found in one day, highest in Maharashtra

महत्त्वाच्या बातम्या