पुण्यातील व्यापाऱ्यांचा सरकारविरुद्ध एल्गार, दुकाने उघडणारच, कारवाईला विरोध करणार म्हणत आंदोलनाचा इशारा


पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्यातील ठाकरे सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. लॉकडाऊन मागे घेतला नाही तरी दुकाने उघडणारच, कारवाईला एकत्रितपणे विरोध करणार असा इशारा ठणकावून दिला आहे.Pune traders protest against the government saying that will open shops and oppose the action


विशेष प्रतिनिधी 

पुणे : पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्यातील ठाकरे सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. लॉकडाऊन मागे घेतला नाही तरी दुकाने उघडणारच, कारवाईला एकत्रितपणे विरोध करणार असा इशारा ठणकावून दिला आहे.

राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातील दुकाने शुक्रवारी उघण्यात येणार आहे.

या आंदोलनानंतर जर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून नियमित दुकाने उघडण्यात येणार असल्याचा इशाराही पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

पुणे व्यापारी संघाच्या पदाधिकारी व सदस्य यांच्यात बैठकीत आयोजित करण्यात आली. त्यावेळी बैठकीत निर्णय घेतला आहे. रांका म्हणाले, आज पुणे व्यापारी वर्गाच्या सदस्य आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक बैठक झाली. त्यात उग्र भावना व्यक्त करण्यात आल्या.

या बैठकीत दोन दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घतला आहे. यात गुरुवारी(दि. ७) विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदविणार आहे.

तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणजे शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे आठ वाजता दुुकाने उघडतील आणि सायंकाळी ६ वाजता बंद करतील. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशा शब्दात रांका यांनी खुले आव्हान दिले आहे.

मात्र या कारवाईवेळी व्यापारी वर्ग एकत्रित होऊन संबंधित व्यापाऱ्याच्या पाठीशी उभा राहील असेही ते म्हणाले.रांका म्हणाले, तसेच या आंदोलनावेळी व्यापारी वर्गाने राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासन यंत्रणेने जाहीर केलेल्या कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे

त्याचप्रमाणे सरकारने जर आपला दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर सोमवारपासून सर्व दुकाने नियमित सुरु करण्यात येतील.

Pune traders protest against the government saying that will open shops and oppose the action

इतर बातम्या वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण