रणजी ट्रॉफी 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला दुजोरा


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते आणि यावेळी 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू करण्याचे नियोजन होते, परंतु देशातील तिसरी लाट पाहता ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रणजी ट्रॉफी २०२२ कधी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. Ranji Trophy to start from February 13th BCCI President Sourav Ganguly


वृत्तसंस्था

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रणजी ट्रॉफी 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. गतवर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते आणि यावेळी 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू करण्याचे नियोजन होते, परंतु देशातील तिसरी लाट पाहता ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रणजी ट्रॉफी २०२२ कधी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. बोर्ड प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय ही स्पर्धा १३ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा विचार करत आहे. या स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



‘स्पोर्ट्स स्टार’शी संवाद साधत गांगुली यांनी स्पर्धेच्या सुरुवातीच्या तारखेची माहिती दिली. सर्व संघांची ५ गटांत विभागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक गटात 6 संघ असतील. तर प्ले ग्रूपमध्ये 8 संघ असतील. गांगुली म्हणाले, ‘आम्ही फेब्रुवारीच्या मध्यापासून रणजी ट्रॉफी सुरू करण्याचा विचार करत आहोत. ही तारीख 13 फेब्रुवारी असू शकते. सध्या तरी रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट तसाच राहणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा एक महिन्याचा असेल जो आयपीएल २०२२ पूर्वी खेळवला जाईल.

जूनमध्ये बाद फेरीचा सामना

रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजित करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लीग स्तरीय सामने होतील आणि बाद फेरीचे सामने जूनमध्ये होतील. ते म्हणाले, ‘आयपीएल 2022 27 मार्चपासून होणार आहे आणि अशा परिस्थितीत जून आणि जुलैमध्ये रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे सामने आयोजित केले जातील. फॉरमॅटमध्ये कोणताही बदल होणार नाही. कोरोनाच्या बाबतीत आम्ही स्पर्धेसाठी ठिकाण शोधत आहोत. आम्ही सध्या सर्व गोष्टींचा विचार करत आहोत.”

Ranji Trophy to start from February 13th BCCI President Sourav Ganguly

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात