Raj Thackeray : ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरें आधी वसंत मोरे बोलणार!!; नाशिकच्या सलीम शेख यांनाही संधी


प्रतिनिधी

मुंबई : राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्याचे भाषण घासल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय एकदा रोखला त्याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे या यांनी आज ठाण्यात उत्तर सभा आयोजित केली आहे या सभेत राज ठाकरे यांच्या आधी पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे त्यांच्याबरोबरच नाशिकचे नगरसेवक सलीम शेख यांचेही सभेत भाषण होणार आहे.Raj Thackeray: Vasant More will speak before Raj Thackeray in Thane’s North Sabha !!; Opportunity for Salim Sheikh of Nashik too

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर मनसेच्या जाहीर सभेतून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा विषय विशेष चर्चेला आणला. त्यानंतर या भूमिकेवर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली वसंत मोरे यांच्या नाराजीला मराठी प्रसारमाध्यमांनी जोरदार हवा दिली ंपूर्ण आठवडाभर वसंत मोर्‍यांच्या नाराजीचा विषय चर्चेत ठेवला.



राज ठाकरे यांनी ठाण्यात या सर्व चर्चांना पूर्ण विराम देण्याच्या हेतूने उत्तरसभेचे आयोजन केले आहे. या सभेत राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या आधी मनसे नेते वसंत मोरे यांना आधी भाषण करू द्यावे, अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर मनसेचे नाशिक मधले नगरसेवक सलीम शेख यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केले होते. त्यांनाही ठाण्यातल्या उत्तर सभेत बोलण्याची संधी दिली जाणार आहे.

वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर मोरे यांना पुण्याच्या प्रमुख पदावरून हटवले. तेव्हापासून मोरे चर्चेत आले होते. राज ठाकरे यांनी यामाध्यमातून कणखर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे, असे स्पष्ट झाले होते, त्यावर मोरे यांची नाराजी चर्चेत आली होती.

राज ठाकरेंचा आदेश

आठवड्याभराच्या प्रतीक्षेनंतर वसंत मोरे उत्तरसभेच्या आदल्या दिवशी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे येऊन भेटले. जवळपास दीड तास वसंत मोरे यांच्याशी चर्चा केली. तुझी जी काही भूमिका होती ती थेट मला सांगायची होतीस. तू मीडियात कशाला गेला होता…?, झालं ते जाऊ देत…तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे उद्याच्या उत्तर सभेत मिळतील, असे राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सांगितले. शिवाय मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना राज ठाकरेंनी सूचना देताना वसंत मोरेंना उत्तर सभेत भाषण करु दे, असे आदेश दिले आहेत.

काय म्हटले वसंत मोरे?

राज ठाकरे यांची भेट घेऊन मी समाधानी आहेत. माझ्या मनात जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मला आजच्या सभेत मिळतील. मी आणि साईनाथ बाबर राज ठाकरेंच्या सभेसाठी पुण्यातून निघालो आहे. सहा वाजता ठाण्यात पोहोचेन. तिथे गेल्यानंतर पक्षाच्या नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेईन. नंतर राज ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे भाषण देखील करेन, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

सलीम शेख यांनी राज ठाकरे यांचे समर्थन केल्यानंतर त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात नाशिक मध्ये जोरदार चर्चा रंगली. सलीम शेख यांचे डीएनए टेस्ट करावी, अशी मागणी करण्यात आली. परंतु सलीम शेख यांनी आपली भूमिका बदलली नाही. आज त्यांना पाण्याच्या उत्तर सभेत बोलण्याची संधी देण्यात आली आहे.

Raj Thackeray: Vasant More will speak before Raj Thackeray in Thane’s North Sabha !!; Opportunity for Salim Sheikh of Nashik too

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात