प्रतिनिधी
नाशिक – महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकवर लक्ष केंद्रीत केले असून मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी लावलेले फलक महापालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत. raj and amit thackeray on nashik political tour, eyes are on muncipal elections
आज २२ सप्टेंबरपासून राज ठाकरे हे अमित ठाकरेंसोबत २ दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले मोठे फलक महापालिका प्रशासनाने काढून टाकले. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नापसंतीचे ट्विट करून ‘रस्त्यावरचे फलक काढाल पण नाशिककरांच्या हृदयातून राजसाहेब आणि मनसे कशी काढाल??, असा प्रश्न विचारला आहे.
राज ठाकरे नाशिकमध्ये विभागप्रमुख आणि शाखाध्यक्षांचा मेळावा घेऊन त्यांच्याकडे प्रत्येक प्रभागाची जबाबदारी सोपविणार आहेत. सन २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणूक होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये राज ठाकरे सक्रीय झाले आहेत.
जुलै महिन्यापासून राज ठाकरे यांनी नाशिक लक्ष केंद्रीत केले आहे. काही वर्षांपूर्वी आपला गड असलेले नाशिक परत मिळवण्यासाठी ठाकरे पितापुत्रांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखाप्रमुखाच्या धर्तीवर मनसेच्या शाखाध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे हे स्वतः शाखाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत लक्ष घालत आहेत.
मात्र, नाशिक महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स काढून मनसेला भाजप वेगळा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर मनसे आता कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App