इतिहासातील काही तथ्ये मला लोकांनी सांगितली, मी ती तपासून घेईल, समर्थ रामदास वादाबाबत राज्यपालांनी स्पष्ट केली भूमिका


विशेष प्रतिनिधी

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात वाचलं होतं, त्यावरून मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला लोकानी सांगितली आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.People told me some facts from history, I will check it, Governor clarifies role regarding Samarth Ramdas controversy

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन देखील होताना दिसत आहेत.



शिवाय, अनेक नेते मंडळींकडून देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. खासदार उदयनराजे भासले यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. तसेच, राज्यपालांनी ताबडतोब खुलासा करावा अशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केली आहे.

People told me some facts from history, I will check it, Governor clarifies role regarding Samarth Ramdas controversy

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात