विशेष प्रतिनिधी
मुंबई: आमच्या सुविद्य पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी माझ्यावर गनिमी कावा केला. दररोज दिवसभर थांबायच्या आणि रात्री झोपायला जायच्या. मी त्यांना फिट राहायचं सांगितलं होतं. पण त्यांनी देखील उपोषण केले असा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.Sambhajirajes wife also went on a hunger strike
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. संभाजी छत्रपती यांनी आझाद मैदानवार उपोषण सुरु केलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून संभाजी छत्रपती यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकारनं मागण्या मान्य करत आमरण उपोषण मागं घेण्याचं आवाहन केले.
संभाजी छत्रपती यांच्या उपोषणाच्या काळात त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती मंचासमोर तीन दिवस उपस्थित राहून आमरण उपोषणाचं आणि मराठा आंदोलकांचं धैर्य वाढवत होत्या. आज संभाजी छत्रपती यांनी उपोषण सोडताना एक गुपित उघड केलं.
संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरवात केली होती. दुसरीकडे त्यांच्या पत्नी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होत्या. संयोगिताराजे उपोषणाच्या काळात मंचासमोर बसलेल्या असायच्या. संयोगिताराजे यांनी देखील उपोषण केलं होतं. त्याचा उलगडा आज झाला.
त्यापूर्वी त्या भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. अखेर आज संभाजी छत्रपतींनी संयोगिताराजे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. तर, संभाजी छत्रपती यांच्या हस्ते संयोगिताराजे यांनी उपोषण सोडलं. संयोगिताराजे म्हणाले, संभाजी छत्रपती यांच्याशी खोट बोलले कारण त्यांना हे टेन्शन सहन झालं नसतं.
त्यांच्या डोक्यात अनेक प्रकारचे स्ट्रेस होते. राजेंची प्रकृती आणि प्रकृती खराब झाल्यास दुसरीकडे प्रश्न सुटण्यावर परिणाम होऊ नये याची काळजी होती. पत्नी म्हणून संभाजीरांचे काळजी होती आणि आई म्हणून समाजाची काळजी होती.
राजेंनी वडील म्हणून मी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. तो व्यवस्थित जावा आरक्षण हा लढा लांबचा आहे. आता जे आपल्या हातात पडू शकतो, त्यावर आपला समाज जगू शकतो, मोठा होऊ शकतो याासाठी हा लढा महत्त्वाचा आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more