Thackeray – Pawar : “आमचे” देशमुख – मलिक; तर “तुमचे” राणा, प्रसंगी राज ठाकरेही…!!; बुद्धीचा सूड, कारवाईचा दंश!!


महाराष्ट्रात सूडाच्या राजकारणाचा वरवंटा खऱ्या अर्थाने फिरायला लागला आहे. महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे प्रवक्ते संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे कर्तेकरविते शरद पवार यांच्या तोंडी सूडबुद्धीच्या राजकारणाची केंद्र विरोधातली भाषा असते, पण प्रत्यक्षात कृती मात्र ते महाराष्ट्रा सूडाच्या राजकारणाची करताना दिसत आहेत. Our “Deshmukh-Malik and your Rana on occasion Raj Thackeray too.

किंबहुना ठाकरे – पवार सरकारचा “आमचे” देशमुख – मलिक तर “तुमचे” राणा दांपत्य आणि प्रसंगी राज ठाकरेही…!! असा “बाणा” दाखवण्याचा मनसूबा दिसतो आहे. अर्थात हा मनसूबा कितपत यशस्वी होईल…??, हा भाग अलहिदा. पण ठाकरे – पवार सरकार आता केंद्र सरकार विरुद्ध खूप तणावाची स्थिती निर्माण करत आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे.

– केसेस मध्ये कायदेशीर गुणात्मक फरक

वास्तविक अनिल देशमुख, नवाब मलिक आणि राणा दांपत्य तसेच राज ठाकरे या प्रत्येकाच्या केसेस भिन्न आहेत. त्यांच्यावरची कलमे भिन्न आहेत, पण कारवाई मात्र महाराष्ट्रात सूडबुद्धीने होताना दिसत आहे.

अनिल देशमुख यांच्यावरचा आरोप 100 कोटींच्या खंडणीचा, मनी लॉन्ड्रिंगचा म्हणजे सरळ सरळ आर्थिक गुन्हेगारीचा आहे.



नवाब मलिक यांच्या वरचा आरोप थेट देशद्रोही दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आहे. त्यात उघडपणे देशद्रोहाचा आणि देश विघातक कृत्याचा अँगल आहे. यात एकटे नवाब मलिक नाहीत, तर त्यांची दोन मुले सामील आहेत.

राणा दाम्पत्यावर मात्र मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अवांछनीय भाषा वापरणे, मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या निमित्ताने राज्यात सामाजिक तणाव पसरवणे हे आरोप आहेत. या आरोपांमध्ये नंतर 124 ए अर्थात देशद्रोहाचे कलम जोडण्यात आले आहे.

राज ठाकरे यांच्यावर सामाजिक शांतता बिघडण्याची कलमे लावून आरोप दाखल करण्यात आला आहे.

याचा सरळ अर्थ असा आहे, की कायद्याच्या कसोटीवर वर उल्लेख केलेल्या प्रत्येक नेत्यावरचे आरोप गुणात्मक दृष्ट्या भिन्नभिन्न आहेत. त्यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने काहीही संबंध नाही.

पण तुम्ही जर “आमच्या” नेत्यांना आर्थिक गुन्हेगारीत अडकवून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असाल, तर आम्ही देखील कायदा तोडून मरोडून का होईना, “तुमच्या” नेत्यांविरुद्ध कारवाई करून दाखवू, अशीच धमकीवजा कृती महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार करत आहे.

– किरीट सोमय्या, दरेकरांवर “प्रयोग”!!

याआधी किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयोग झाले आहेत. पण कोर्टाने ठाकरे – पवार सरकारचे ते “प्रयोग” हाणून पाडले आहेत.

देशमुख – मालिकांवर कोर्टाची कारवाई

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या केसेस मध्ये प्रत्यक्ष कोर्टाने देखील त्यांना सोडलेले नाही, राणा दाम्पत्याच्या बाबतीत 124 हे कलम लावल्याने कोर्टात हे प्रकरण अडकले आहे.

– राज ठाकरे 2008 ची केस

पण राज ठाकरे यांच्याबाबत असे नाही. राज ठाकरे यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. 2008 च्या केसचे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. त्याचे “राजकीय टायमिंग” आत्ताच साधण्यातूनच ठाकरे – पवार सरकारची सूडबुद्धीच दिसून येते.

– मशिदींवरचे भोंगे उतरले नाहीत

राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. उत्तर प्रदेशात 60000 भोंगे उतरले, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मशिदींवरचा एकही भोंगा महाराष्ट्रात उतरवलेला नाही. मात्र, राज ठाकरे यांच्याविरोधात इतकेच काय, पण 13000 मनसैनिकांनी विरोधात कारवाईचा वरवंटा मात्र फिरवायला ठाकरे – पवार सरकार सज्ज आहे. हाच यातला खरा सूडबुद्धीचा दंश आहे…!!

Our “Deshmukh-Malik and your Rana on occasion Raj Thackeray too.+

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात