“एक देश एक रेशन कार्ड” योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरु ; लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीद्वारे धान्य प्राप्त करण्याची सुविधा


विशेष प्रतिनिधी

पुणे : केंद्र सरकारच्या “एक देश एक रेशनकार्ड” योजनेंतर्गत लाभार्थ्यांना राज्यातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून तसेच जिल्ह्यातून धान्य उचलण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांचा मोठा फायदा झाला आहे. One Country One Ration Card scheme started Beneficiaries get facility to get grain through portability

“एक देश एक रेशन कार्ड” योजनेमुळे रास्तभाव दुकानात आधार प्रमाणिकरण करून लाभार्थ्याला पोर्टेबिलिटीद्वारे धान्य मिळणार आहे. सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा 7 लाख शिधापत्रिकांवर जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याची उचल केली जाते.



एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ९४.५६ लाख जणांनी जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटीद्वारे धान्याचा लाभ घेतला.’एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची सुरुवात २०१८ मध्ये इंटिग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (आयएम- पीडीएस) म्हणून केली होती.

ऑगस्ट २०१९ मध्ये २ क्लस्टर्सच्या स्वरुपात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश व तेलंगणा या चार राज्यांमध्ये एक देश ‘एक रेशन कार्ड’ची अंमलबजावणी प्रायोगिक स्वरूपात केली. या दोन क्लस्टर्सपैकी एकामध्ये महाराष्ट्रासह गुजरात ही राज्य होती.

जानेवारी, २०२० पासून ‘एक देश एक रेशन कार्ड’ ची अंमलबजावणी १२ राज्यात (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, त्रिपुरा व गोवा) करण्यात आली.

डिसेंबर २०२० पासून एकूण ३२ राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरु झाली आहे. केंद्रशासित प्रदेशातील कोणताही एनएफएसए कार्डधारक बायोमेट्रिक आधार प्रमाणित करून कोणत्याही राज्यातून धान्य घेऊ शकतो.

या योजनेतंर्गत १५ एप्रिल, २०२१ पर्यंत महाराष्ट्रातील ६३२० शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांनी बाहेरील राज्यांमध्ये धान्याची उचल केली. तसेच इतर राज्यातील ३५२१ शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रात धान्याची उचल केली आहे.

 One Country One Ration Card scheme started Beneficiaries get facility to get grain through portability

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात