विस्तारा विमान कंपनीचा कोरोनाविरुध्दचा लढा, डॉक्टर- नर्सना मोफत प्रवासाची सुविधा


कोरोनामुळे संपूर्ण देशात रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केलीय. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिलीय. संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेऊ, असेही कंपनीने म्हटले आहे.vistara airline’s fight against corona, free travel facility for doctors-nurses


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोनामुळे संपूर्ण देशात रुग्णालयांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विस्तारा या विमान कंपनीनं देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केलीय.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिलीय. संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेऊ, असेही कंपनीने म्हटले आहे.



उषा पाधी यांनी आपल्या ट्विटमध्ये विस्ताराच्या पत्राबद्दल माहिती दिलीय. आपण एकत्र या संकटाशी लढाऊ या, असे म्हणत सरकारी संस्था आणि रुग्णालयांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी विस्तारा हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहे.

कोरोनाशी सामना करण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या विनामूल्य हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिलाय. फ्रंटलाईन कामगारांना एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी विनामूल्य घेऊन जाणार आहेत.

आपल्या डॉक्टर आणि परिचारिकांना एका ठिकाणाहून दुसºय ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा देऊ शकल्यास आम्हाला खूप आनंद होईल, असे पत्रात म्हटलेय. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जागी परत पाठवण्याची जबाबदारी देखील घेऊ शकतो.

विस्तारा यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे, की जागांची मयार्दीत उपलब्धता लक्षात घेता आम्ही वैद्यकीय डॉक्टर्स आणि नर्सेसना पहिल्यांदा आल्यास पहिल्या जागा उपलब्ध करून देणार आहोत.

या व्यतिरिक्त स्पाईसजेट आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी देश किंवा विमान उड्डाण तिकिटांसाठी वेळ किंवा तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. इंडिगो 30 एप्रिलपर्यंत आणि 15 मेपर्यंत स्पाईसजेट या नव्या बुकिंगसाठी चेंज शुल्क घेणार नाही.

vistara airline’s fight against corona, free travel facility for doctors-nurses

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात