मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडली सुमारे चार कोटी रुपयांची अवैध रक्कम


मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान एका मारुती स्विफ्ट कारमधून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक करणाऱ्या कारची झाडाझडती केली असता, सदर कारच्या चोर कप्प्यात सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली असून, ती रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. On Pune- Mumbai express Highway pune rural police catched one suspected car and seized four cr rupees


विशेष, प्रतिनिधी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान एका मारुती स्विफ्ट कारमधून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक करणाऱ्या कारची झाडाझडती केली असता, सदर कारच्या चोर कप्प्यात सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली असून, ती रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून, आयकर विभागाच्या तपासात सदर रक्कमे बाबतचा खरा प्रकार उजेडात येईल.

कार चालक महेश नाना माने (रा . विटा, सांगली ) व विकास संभाजी घाड़गे (रा . शेटफळ, सांगली) अशी अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार २८ मार्चला पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून अवैध शस्त्र व पैशाची वाहतूक होणार आहे. त्या मिळालेल्या माहितीनुसार सदर गुप्त बातमीची शहानिशा करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रविण मोरे , पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर , पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे , सहा फौजदार शिताराम बोकड , युवराज बनसोडे , अमित ठोसर गणेश होळकर , किशोर पवार , सिद्धेश्वर शिंदे व पुष्पा घुगे यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान देवले गावच्या हद्दीत सापळा रचला होता.



यादरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका संशयित मारुती स्विफ्ट कारला (क्रमांक-केए-५३/एमबी-८५०८) इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ती न थांबता पुढे निघाली. त्याबाबत अधिक संशय बळावल्याने सदर कार पोलिसांच्या पथकाने मोठ्या कौशल्याने पुढे थांबविण्यात आले. यावेळी त्या कारची तपासणी केली असता, कारमधील एका चोर कप्प्यात सुमारे चार कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याप्रकरणी कार चालक महेश माने व विकास घाडगे यांना सदर रक्कमे बाबत विचारपुस केली. मात्र त्यांच्याकडे यासंदर्भातील कोणतीही ठोस कागदपत्रे, पुरावे व वाहतूक परवाना सादर करता तसेच त्याबाबतचे कारण सांगता आले नाही.

एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम कोठुन व कशासाठी आणली कोठे लपुन छपुन कोणत्याही कागद पत्राशिवाय घेऊन जात होते. याबाबतचा तपास पोलीस करीत आहे. तसेच या प्रकरणी आयकर विभाग पुणे यांना कळविण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई आयकर विभागाच्या वतीने करण्यात येणार असून, त्यांच्या चौकशीतून सदर रक्कमे बाबतचा खरा उलगडा समोर येईल.

On Pune- Mumbai express Highway pune rural police catched one suspected car and seized four cr rupees

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात