विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करायला कोल्हापुरात येणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात हातात पायताण घेऊन आंदोलन करणारे राष्ट्रवादीतले मुश्रीफ समर्थक आता नरमले आहेत. NCP supporters of hasan mushriff take aback over allegations by kirit somaya
किरीट सोमय्या हे 28 तारखेला मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी येत आहेत. त्यावेळी मुरुगुड या गावात सोमय्या ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर काळे झेंडे लावून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे “स्वागत” करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या पायताण आंदोलनामुळे किरीट सोमय्या यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. राज्यभर हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता जाग आली आहे. किरीट सोमय्या यांकडे दुर्लक्ष केले असते तर असे घडले नसते, असा “साक्षात्कार” त्यांना झाला आहे. त्यातून हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच मुरगुड पोलीस स्टेशनला जेव्हा किरीट सोमय्या तक्रार दाखल करायला येतील तेव्हा फक्त काळे झेंडे लावून त्यांचे “स्वागत” करण्याचा निर्णय झाला आहे, असे मुरगूड चे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले.
किरीट सोमय्या पारनेरला देखील गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोणताही विरोध केला नाही. त्याच्या बातम्या झाल्या. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप हवेत विरल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मत झाले. त्यामुळेच किरीट सोमय्या यांच्याकडे दुर्लक्ष करून आरोपांमधली हवा काढून घेण्याचा प्रयत्न आता राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App