NAGPUR MP cultural Festival : नागपुरात खासदार महोत्सव! नितीन गडकरींनी सुरू केलेला महोत्‍सव ; कोव्हिड नियमांचे पालन करून दिवस सोहळा


  • खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद्घाटन
  • सुखविंदर सिंह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा करणार आहेत.

 

विशेष प्रतिनिधी

नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सव -2021 (MP cultural Festival) चा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे.हा मध्‍य भारतातील सर्वात मोठा सांस्‍कृतिक उत्‍सव मानला जात आहे. बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते खासदार महोत्‍सवाचे उद्घाटन होणर आहे.NAGPUR MP Cultural Festival: MP Festival in Nagpur! Festival started by Nitin Gadkari; Celebrate the day by following the Covid rules

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्‍यवर उपस्थित राहतील.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता.



भारतीय कला व संस्‍कृतीचा प्रचार-प्रसार व्‍हावा, विदर्भातील प्रतिभावंतांना मोठा मंच मिळावा, राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीच्‍या कलाकारांची कला नागपूरकरांना अनुभवता यावी, या हा त्‍यामागील उद्देश होता.कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्‍या खंडानंतर परत एकदा खासदार महोत्‍सवाचं भव्‍य आयोजन करण्‍यात आलंय.

यंदा देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करीत आहे. त्‍याच संकल्‍पनेवर महोत्‍सवाची आखणी करण्‍यात आलेली आहे. मान्‍यवरांच्‍या उपस्‍थ‍ितीत खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे उद्घाटन झाल्‍यानंतर लगेच चक दे इंडिया या थीमवर फिल्‍मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्‍वगायक सुखविंदर सिंह यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट होणार आहे.

सुखविंदर सिंह खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात देशभक्‍तीपर गीतांच्‍या माध्‍यमातून स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव धुमधडाक्‍यात साजरा करणार आहेत.

घरबसल्‍या मिळवा पासेस

नागपूरकरांनी या दहा दिवसीय खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आनंद घ्‍यावा, असे आवाहन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे अध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रा. अनिल सोले व पदाधिका-यांनी केले आहे. नागपूरकरांना या सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आस्‍वाद घेता यावा, या उद्देशाने यंदा ऑनलाईन माध्‍यमातून घरबसल्‍या पासेस मिळवता येणार आहेत.

त्‍याकरिता नागरिकांनी 9158880522 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. एक डिजिटल लिंक तयार होईल. ही लिंक क्‍लीक केल्‍यानंतर कार्यक्रमाची पास घरबसल्‍या आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करता येईल.

कोविड नियमांचे होणार पालन होणार

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात दरवर्षी होणारी गर्दी बघता यंदा कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर सरकारने त्‍यासंदर्भात घालून दिलेल्‍या सर्व अटी व नियमांचे पालक केले जाणार आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समितीची त्‍यासाठी मदत घेतली जात आहे. आयोजनस्‍थळी दररोज 8 ते 10 हजार N- 95 मास्‍क वितरित केले जाणार आहेत. दोन खुर्च्‍यांमध्‍ये सुरक्षित अंतर राखले जाणार असून पटांगणाच्‍या सहा प्रवेशद्वारांवर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था राहणार आहे.

NAGPUR MP Cultural Festival: MP Festival in Nagpur! Festival started by Nitin Gadkari; Celebrate the day by following the Covid rules

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात