“बी.कॉमचा निकाल जाहीर करा, नाहीतर उडवून टाकू!”, मुंबई विद्यापीठाला बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी

Mumbai University get threat e mails with warning of bomb blast

Mumbai University : मुंबई विद्यापीठाला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे. ई-मेलमध्ये म्हटले आहे की, बी.कॉमचा निकाल लवकरात लवकर जाहीर करा. अन्यथा मुंबई विद्यापीठ बॉम्बने उडवले जाईल. धमकी देणारा ईमेल 10 ते 12 ऑगस्टपर्यंत येत होते. Mumbai University get threat e mails with warning of bomb blast


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे. ई-मेलमध्ये म्हटले आहे की, बी.कॉमचा निकाल लवकरात लवकर जाहीर करा. अन्यथा मुंबई विद्यापीठ बॉम्बने उडवले जाईल. धमकी देणारा ईमेल 10 ते 12 ऑगस्टपर्यंत येत होते.

ईमेलमध्ये अपशब्द वापरण्यात आले आहेत. 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी सातत्याने ईमेल आले आहेत. 12 ऑगस्ट रोजी आलेल्या ईमेलमध्ये बी.कॉमचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यास सांगण्यात आले असून बॉम्बचा फोटो पाठवण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाने पोलिसांना कळवले

सलग तीन दिवस धमकीचे मेल आल्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठात प्रथमच सर्व शैक्षणिक विभागांसाठी केंद्रीकृत प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात 12 ऑगस्टपासून झाली आहे. पहिल्या दिवसापासून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आपली उत्सुकता दर्शविली आहे. अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठात आलेल्या धमकीच्या मेलमुळे विद्यापीठ प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Mumbai University get threat e mails with warning of bomb blast

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात