Raj Thackeray : एकीकडे राज ठाकरेंना धमक्या; दुसरीकडे भोंगे परवानगीसाठी मुस्लिम संघटनांची धावपळ!!


प्रतिनिधी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे 3 मेच्या आत खाली उतरावा, अन्यथा त्यानंतर मशिदींसमोर दुप्पट संख्येने भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर काही मुस्लिम संघटनांनी राज ठाकरे यांना धमक्या दिल्या आहेत, पण त्याच वेळी भोंग्यांच्या परवानगीसाठी मुस्लिम संघटनांनी धावपळ सुरू केली आहे. अल्टिमेटमच्या आधीच मशिदींवरील भोंगे अधिकृत करण्यासाठी मुस्लिम संघटनांनी पोलीस ठाण्यांना अर्ज केले आहेत. MNS chief Raj Thackeray should lower the horns on mosques in the state by May 3

सुन्नी जमियात उलेमाचे पत्र

ऑल इंडिया सुन्नी जमियातुल उलेमा या संघटनेन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील मशिदीवर लाऊडस्पीकर वापरासाठी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करू, असे देखील या पत्रात म्हटले आहे. मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना ज्या मशिदींनी परवानगी मागितली आहे. त्यांना मुभा देण्याची सूचना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी द्यावी, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. आम्ही मशिदीच्या ट्रस्टींना तात्काळ परवानगीसाठी पोलिसांना अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत, असेही या पत्रात म्हटले आहे.

– रझा अकादमीचे कबुली

रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईड लाईन्स पूर्णपणे पालन मशिदीकडून केले जाईल असे म्हटले आहे. मुंबईतील प्रत्येक मशीदकडे लाऊडस्पीकरची परवानगी आहे. ज्या मशिदीकडे भोंग्यांची परवानगी नाही, ते परवानगी घेतील, असे रझा अकादमीने म्हटले आहे.

– मंदिरांवरही भोंगे लावण्याची परवानगीची मागणी

राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर मुस्लिम संघटना मशिदीवरून भोंगे खाली उतरवण्यास तयार नाहीत, मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंग्यांचा वापर करण्याची तयारी मुस्लिम संघटनांनी दर्शवली आहे. त्यामुळे आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनीही जर मशिदींसाठी हा नियम असेल तर तो सर्व धर्मियांना लागू करावा, त्यानुसार हिंदू मंदिरांवरही भोंगे लावण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे, त्यामुळे मुस्लिमांच्या नव्या भूमिकेमुळे आणखी वाद चिघळण्याची शक्यता आहे.

MNS chief Raj Thackeray should lower the horns on mosques in the state by May 3

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात