इन्फोसिसचे शेअर्स ६.८९ टक्क्यांनी घसरले


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या शेअर बाजारांमध्ये खूप मोठे चढ-उतार होत आहेत. त्यातच आता इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. सोमवारी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये इन्फोसिसचे शेअर्स ६.८९ टक्क्यांच्या घसरणीसह १६२८.१० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

Shares of Infosys fell 6.89 per cent

कंपनीच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिले. नंतर आयटी कंपनी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये अशी घसरण झाली. दोन वर्षांहून अधिक काळातील इन्फोसिसच्या समभागांमध्ये झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्यानंतर बीएसईवरील इन्फोसिसचे बाजार भांडवल ६,९२,२८कोटी रुपयांवर आले आहे. सुरुवातीच्या व्यापारातच गुंतवणूकदारांचे ४०,००० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. निफ्टी आयटी निर्देशांकात सर्वाधिक घसरण झाली आहे. निर्देशांक सुमारे ४ टक्क्यांनी घसरला.

इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ नोंदवली. ५,६८६ कोटी रुपयांची नोंद केली. ती मागील वर्षीच्या याच कालावधीत ५,०७६ कोटी रुपये होती. त्याच वेळी, कंपनीचा महसूल सुमारे २३ टक्क्यांनी वाढला. ३२,२७६ कोटी रुपयांवर पोहोचला

Shares of Infosys fell 6.89 per cent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात