विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: व्होट बँकेच्या राजकारणासाठी अनेक दशकांपासून समाजकंटकांशी तडजोडी केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील दोन कॅबिनेट मंत्र्यांना भ्रष्टाचार, खंडणी आणि असामाजिक घटकांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हे काळजी करण्यासारखे काही आहे का? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे.Isn’t it worrying that two ministers of Maharashtra have been arrested on charges of corruption, extortion and links to anti-social elements? J. P. Nadda’s question
द्वेषयुक्त भाषण आणि जातीय संघर्षाच्या घटनांवरून मोदी सरकारवर हल्ला करणाºया विरोधकांच्या संयुक्त वक्तव्यावर खुल्या पत्राद्वारे नड्डा यांनी हल्लाबोलत केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांचे डोळे उघडले आहेत. याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे. भारतातील तरुणांना विकास हवा आहे. विनाश नाही.
एवढी दशके देशावर सत्ता गाजवणारे पक्ष आता इतिहासाच्या सीमारेषेत का मर्यादित आहेत. गेल्या आठ वर्षांत देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल झाला आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली देश सबका साथ, सबका विकास, सबका विश्वासवर पुढे जात आहे. मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की विकासाचे राजकारण करा.
जनतेने नाकारलेल्या आणि निराश झालेल्या पक्षांकडून विकासाच्या राजकारणाचा कडवटपणे विरोध केला जात आहे. ते पुन्हा एकदा व्होट बँक आणि फुटीरतावादी राजकारणाचा आश्रय घेत आहेत. आज भारत राजकारणाच्या दोन विशिष्ट शैली स्पष्ट दिसत आहेत. एनडीएचे प्रयत्न कार्यात दिसत आहे. मात्र, विरोधकांच्या गटातटाच्या राजकारणात संकुचितपण आहे. गेल्या काही दिवसांत हे पक्ष पुन्हा पत्राच्या रुपाने एकत्र आलेले आहेत. माझ्या त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी मार्ग बदलून विकासाचे राजकारण स्वीकारावे.
विरोधकांच्या जातीय तणावाच्या आरोपवर उत्तर देताना नड्डा यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सत्तेत असताना झालेल्या दंगलींवरून प्रश्न विचारला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर हजारो शिखांच्या हत्येचे समर्थन करणारे राजीव गांधींचे कुप्रसिद्ध शब्द – ‘जेव्हा एक मोठा वृक्ष पडतो तेव्हा पृथ्वी हादरते’ हे कोण विसरू शकेल.
गुजरात 1969, मुरादाबाद 1980, भिवंडी 1984, मेरठ 1987 , काश्मीर खोºयात 1980 च्या दशकात हिंदूंविरुद्ध विविध घटना, 1989 भागलपूर, 1994 हुबली…काँग्रेस राजवटीत जातीय हिंसाचाराची यादी मोठी आहे. 2013 मध्ये मुझफ्फरनगर दंगल कोणत्या सरकारच्या अंतर्गत झाली. 2012 मध्ये आसामची दंगल कोणाच्या कार्यकाळात झाली असा सवालही त्यांनी केला आहे.
राजस्थानच्या करौली येथील हिंसाचारावर काँग्रेस शांत का आहे?, असा सवाल करत जे. पी नड्डा यांनी म्हटले आहे की बंगाल आणि केरळमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महाराष्ट्रातले दोन मंत्री तुरुंगात आहेत. त्यावर काँग्रेस गप्प का आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App