कॉँग्रेसला धोबीपछाड देण्याच्या तयारीत शरद पवार, बरी ताकद असलेल्या कर्नाटकात कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी आता राष्ट्रवादी मैदानात


विशेष प्रतिनिधी

बेंगळुरू: गुजरातमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केल्याचे बोलले जात होते. अगदी तशीच परिस्थिती आता कर्नाटकात आहे. बरी ताकद असलेल्या कर्नाटकात कॉँग्रेसचा खेळ बिघडविण्यासाठी शरद पवार यांनी आता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.Sharad Pawar is now in Karnataka to spoil the game of Congress

कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये निवडणुका आहेत. देशातील ज्या काही राज्यांत कॉँग्रेसची संघटना आणि बºयापैकी ताकद आहे त्यामध्ये कर्नाटकाचा समावेश होतो. मात्र, पवार यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी नेमका कर्नाटकच निवडळा आहे. महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. पवार बेंगळुरू येथे पोहचले असता त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विजयी घोडदौड रोखायची असेल तर शरद पवार हाच योग्य पर्याय असेल, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यापासून अनेक जण पसरवित आहेत. यामध्ये कॉँग्रेसकडून यूपीएचे अध्यक्षपद काढून घेण्याची रणनिती आहे. यासाठी पवारांना कॉँग्रेसच्या कट्टर विरोधक असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यापासून अनेकांची मदत होत आहे.

बंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना पवारांनी कॉँग्रेसला पूर्णपणे वगळून ममता बॅनर्जी आणि उध्दव ठाकरे यांचे गुणगान गायले. ते म्हणाले, भाजपच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर आम्हाला तसे लेखी कळवले आहे. याचा पुढाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यावर आम्ही विचार करत आहोत. इतर नेत्यांशी बोलून आम्ही अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख अद्याप ठरलेली नाही.

बेंगळुरूतील बनासवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्यात पक्षवाढीचा संकल्प पवार यांनी बोलून दाखवला. आम्ही देशपातळीवर पक्षाची बांधणी करत आहोत. ज्या राज्यात पक्षाची शक्ती कमी आहे अशा राज्यांपैकी कर्नाटक एक राज्य आहे. इथे थोडे जास्त लक्ष देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. पुढील संपूर्ण वर्ष मी किंवा माझे सहकारी अधूनमधून या ठिकाणी येऊन पक्षाचे काम वाढवतील, असे ते म्हणाले.

Sharad Pawar is now in Karnataka to spoil the game of Congress

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात