विशेष प्रतिनिधी
कानपूर : तुम्ही तर दोन मुलं जन्माला घातली आहेत. हम दो, हमारे दो.. पण माझी विनंती आहे की हिंदू समाजाच्या बांधवांनो, दोन नाही, चार मुलांना जन्माला घाला. त्यातली दोन मुलं देशासाठी समर्पित करा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनतील. ते बजरंगदलाचे बजरंगदेव बनतील. ते विश्वहिंदू परिषदेचे समर्पित कार्यकर्ते बनतील,असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी ऋतंभरा यांनी केले आहे.Hindu brothers give birth to not two but four children, dedicate for two countries, controversial appeal of Sadhvi Ritumbhara
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेने रामोत्सवाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान साध्वी ऋतंभरा यांचे भाषण झाले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी जाती-पातींमधून बाहेर या. राष्ट्रीय स्वाभिमान असायला हवा. कोणताही राजकीय पक्ष जातींचे गाजर दाखवून आपल्याला भुलवू शकत नाही. माझा देश आणि माझ्या देशाचं भलं सर्वतोपरी असायला हवं. हिंदू जातीचा हाच मंत्र असायला हवा.
अखिल भारतीय संत परिषदेचे हिमालयातील प्रभारी यती सत्यदेवानंद सरस्वती यांनी म्हटलेआहे की, भारतात लोकशाही असून हिंदू बहुसंख्यांक आहेत. पण नीट योजना आखल्याप्रमाणे जास्तीत जास्त मुलांना जन्म देत मुस्लीम त्यांची लोकसंख्या वाढवत आहेत.
म्हणूनच आमच्या संस्थेने हिंदूंना भारत इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचं असेल तर जास्त मुलांना जन्म देण्यास सांगितलं आहे.यती सत्यदेवानंद सरस्वती यांच्या विधानावरून वाद होण्याची शक्यता असताना आता साध्वी ऋतंभरा यांच्या विधानामुळे वाद सुरू झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App