विशेष प्रतिनिधी
मुंबई : पावसाळ्यात जून ते सप्टेंबरदरम्यान १८ दिवस मुंबईला भरतीचा धोका आहे. या दिवसांत साडेचार मीटरहून अधिक उंचीची भरती समुद्राला येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जून महिन्यात सहा दिवस समुद्राला साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. २५ आणि २६ जून रोजी ४.८५ मीटरची या मोसमातील सर्वात मोठी भरती आहे. २३ ते २८ जूनपर्यंत सलग साडेपाच मीटरहून अधिक उंचीची भरती समुद्राला येणार आहे. Metrological dept. gave alert for Mumbai
समुद्राला भरती असताना जोरदार पाऊस आल्यास मुंबई जलमय होते. तसेच, पावसाळ्यात वाऱ्याचाही वेग जास्त असल्याने भरतीच्या वेळी उंच लाटा उसळतात. समुद्राला साडेचार मीटरहून अधिक भरती असल्यास ती धोक्याची मानली जाते.
मुंबईतील पावसाळी पाणी नाल्यातून समुद्र अथवा खाडीत जाते. समुद्राला भरती आल्यास पावसाचे पाणी समुद्र किंवा खाडीत जात नाही. ते पाणी शहरात साचून राहते. त्यातच खाडी, नाल्यांमधून समुद्राच्या भरतीचे पाणी शहरात येते. समुद्राला भरती असताना मिठी नदीचे पाणी थेट कुर्ल्यांपर्यंत जाते. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App