विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ३१ मे पर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ई-मेल व सोशल मीडियाद्वारे निरोपांची आणि दैनंदिन कामाच्या अहवालाची देवाण-घेवाण हीच कर्मचाऱ्यांची प्रमुख कार्यशैली राहील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. Central govt direct new guidelines for work
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांत रोज हजेरी लावण्यासंदर्भात नवे नियम जारी केले आहेत. साऱ्या कार्यालयीन बैठका शक्यतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणे आणि कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नव्या अधिसूचनेनुसार दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून पूर्ण सूट देण्यात आली आहे. या महिनाअखेरपर्यंत हे नियम लागू राहतील. गर्भवती महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली असली तरी त्यांनी घरूनच काम चालू ठेवावे आणि त्याचा रोजच्या रोज अहवाल त्यांच्या वरिष्ठांना द्यावा, असे सांगण्यात आले आहे. बायोमेट्रिक प्रणाली पुढील आदेशापर्यंत स्थगित केली आहे.
गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळांची विभागणी करण्यास सांगण्यात आले असून मास्कचा कायम वापर, सामाजिक अंतरभान पाळणे, हात वारंवार धुणे ही त्रिसूत्री वापरण्यास सुचवले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांनी घरातूनच कार्यालयीन कामकाज करावे असेही सुचवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App