विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – दिल्लीला दररोज सातशे मेट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनचा पुरवठा तुम्हाला करावाच लागेल. तुम्ही आमचे हे आदेश पाळणार नसाल तर आम्हाला अधिक कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे. SC lashed on govt. on oxygen supply issue
न्या. डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने राजधानीला कोणत्याही स्थितीमध्ये ऑक्सिजन मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. कोणत्याही स्थितीमध्ये दिल्लीला सातशे मेट्रिक टन ऑक्सिजन मिळायलाच हवा. आमच्यासाठी काम होणे महत्त्वाचे आहे.
केंद्र सरकारने आम्हाला अधिक कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नये. या पुरवठ्यामध्ये अनेक अडथळे दिसून येत आहेत, काही ठिकाणी कंटेनर नाहीत, बऱ्याच ठिकाणी वाहतुकीमध्ये देखील अडचणी येत आहेत, असे न्यायालयाने सांगितले.
आम्हाला या प्रकरणामध्ये कठोर पावले उचलायची नाहीत पण तसे करण्याला भाग पाडू नका. आमचे आदेश तीन वाजेपर्यंत संकेतस्थळावर अपलोड होतील पण तुम्ही ऑक्सिजनची तातडीने सोय करा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more