भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला पोहोचवला १७४ टन ऑक्सिजन


वास्तविक राज्यस्तरीय ऑक्सिजनची व्यवस्था करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र यात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य नाकर्ते ठरले. ऑक्सिजनअभावी अनेकांचा नाहक बळी कोरोना संकट काळात गेला. मात्र महाराष्ट्राची ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी भारतीय रेल्वेने जोरदार मोहिम उघडली असून आत्तापर्यंत 174 टन ऑक्सिजन महाराष्ट्रात वाहून आणला आहे. यामुळे हजारो मराठी माणसांना प्राणदान मिळाले आहे. Railways delivered 174 tons of oxygen to Maharashtra


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातही देशातल्या सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेल्या महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारला पुरेशा सोयीसुविधा देता आलेल्या नाहीत. केवळ ऑक्सिजनच्या तुटवड्यापायी महाराष्ट्रात अनेक बळी गेले आहेत. ऑक्सिजनचा हा तुटवडा भरुन काढण्यासाठी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी भारतीय रेल्वे गतीमान केली आहे.

या रेल्वेने महाराष्ट्राला आतापर्यंत 174 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला असून भविष्यातही हा पुरवठा चालू राहणार आहे. एवढेच नव्हे तर देशातली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेसदेखील महाराष्ट्रातूनच चालू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.



 

दिल्लीत सत्ता गाजवणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिन्याभरापूर्वीच दिल्ली कोरोना उपचारात गतीमान असल्याची फुशारकी मारली होती. प्रसारमाध्यमांधून कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करुन केजरीवाल यांनी दिल्ली सरकारच्या कामगिरीचे ढोल पिटले होते. मात्र गेल्या काही दिवसात दिल्लीत हाहाकार माजला आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने दिल्लीत अनेकांचे बळी जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने आत्तापर्यंत सर्वाधिक 1334 टन ऑक्सिजन दिल्लीत पोहोचवला आहे. त्यामुळेच केजरीवाल सरकारची तारंबळ कमी होऊ शकली आहे.

भारतीय रेल्वेने देशभरात आत्तापर्यंत 47 ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवल्या असून याद्वारे एकूण 2960 टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच बिकट अवस्था असलेल्या दिल्लीत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. त्या खालोखाल देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशात रेल्वेने ऑक्सिजन वाहून नेला आहे. भारतीय रेल्वेने महाराष्ट्रात आतापर्यंत ऑक्सिजनचे १० टँकर आणले असून यातील ऑक्सिजन नाशिक आणि नागपूर या दोन शहरांमध्ये पुरवण्यात आला.

कोरोना रुग्णसंख्या देशभर वाढत असून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पानद केंद्रांपासून देशभर ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे. ऑक्सिजनचा जलद आणि सुरक्षित पुरवठा करण्यासाठी रेल्वेसारखा प्रभावी आणि किफायती मार्ग दुसरा नाही. त्यामुळेच ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवल्या जात आहेत. दक्षिण भारतातील विशाखापट्टणम पासून अंगुल, बोकारो, रुरकेला येथून ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे.

Railways delivered 174 tons of oxygen to Maharashtra

महत्वाच्या  बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात