मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय सन्मान ! ‘पगल्या’ ला तुर्की-ओन्कोमध्ये पुरस्कार


  • आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे.

  • लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे स्थान आणि प्राण्यांबद्दल असणाऱ्या त्यांच्या निरागस भावना या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  • पगल्या हा सिनेमा एका चिमुकल्यावर आधारित आहे. ऋषभ आणि दत्ता या दोन मुलांची ही कहाणी असून, जी मुलं दहा वर्षाच्या आसपास वयोगटातील आहेत, त्यांच्याभोवती सिनेमाचं कथानक फिरतं. एक शहरातील तर एक खेड्यातील असे हे मित्र. एका मित्राचं हरवलेलं कुत्र्याचं पिल्लू दुसऱ्याला सापडतं आणि ते कसे मित्र बनत गेले, ही साधी, सरळ पण प्रत्येकाला आपली वाटणारी ही कहाणी आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘पगल्या’ या मराठी चित्रपटाने मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 मध्ये समीक्षकांची मने जिंकल्यानंतर दिग्दर्शक विनोद पीटर यांनी ‘ग्लॅडिएटर फिल्म फेस्टिव्हल’ (टीजीएफएफ) तुर्की येथे या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि ओन्को एस्टोनिया इथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. Marathi Film Puglya wins best film Director award in turkey and Onkyo

या पुरस्कारामुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटाच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेले आहे. इतकेच नाही तर आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे.

विनोद सॅम पीटर म्हणतात की, “एक निर्माता म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटाला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळतेय ते पाहून मी खूप खूष आहे. अधिकृत निवडीबद्दलच नाही तर अनेक महोत्सवात या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार गौरवास्पद आहेत. मला आनंद होत आहे की, एका मराठी चित्रपटाला विविध देशांमध्ये आपली ओळख मिळत आहे. असे बरेच काही फिल्म फेस्टीव्हल झाले आहेत ज्यांत निवडलेल्या किंवा पुरस्कार मिळालेल्या यादिंमध्ये ’पगल्या’ हा पहिला चित्रपट आहे. भारताचा झेंडा जगभरात झळकल्याचा आपल्याला अभिमानच वाटतो.”

बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड

‘पगल्या’ या मराठी चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021 चा (Moscow International Film Festival 2021) बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड मिळाला आहे. तसेच इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील चित्रपट महोत्सवात देखील या चित्रपटाची निवड झाली आहे.

Marathi Film Puglya wins best film Director award in turkey and Onkyo

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात