WATCH : गुलाबी थंडीमुळे आंबा बागायतदारांना दिलासा गारठ्यामुळे मोहोर प्रक्रियेला सुरूवात


विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी – थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. मात्र काही ठिकाणी वाचलेल्या मोहरावरील फळे सुपारीच्या आकाराची व थोडी मोठी झाली आहेत.Mango due to frost Consolation to the gardeners

थंडीचे सातत्य कायम असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोरामुळे फळधारणा झाली असून त्याचे प्रमाण २५ टक्के आहे. या मोहोराला फळ धारणा होऊन आंबा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. या वर्षी गुढीपाडव्याला आंबा बाजारात आला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असणार आहे.



यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. शिवाय ऑक्टोबर हीट ही चांगली झाल्याने नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच मोहोर प्रक्रिया सुरू झाली. परंतु दिवाळीत अवकाळी पाऊस झाल्याने काही ठिकाणी मोहोर कुजला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातातून निसटले.

पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पालवी सुरू झाली आहे.गेले काही दिवस थंडीचे प्रमाण चांगले असल्याने मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे .काही ठिकाणी फळधारणा ही सुरू झाली आहे हा आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.

  • गुलाबी थंडीमुळे आंबा बागायतदारांना दिला
  •  गारठ्यामुळे मोहर प्रक्रियेला सुरूवात
  • दुसऱ्या टप्प्यातील मोहरामुळे फळधारणा
  • पहिल्या टप्प्यात पावसाने मोहर कुजला
  • आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार
  • बाजारात येण्यास मे महिना उजडणार

Mango due to frost Consolation to the gardeners

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात