धुक्यात हरवला संगमनेर तालुका..!; काश्मीर, महाबळेश्वरला आल्यासारखे पर्यटकांना वाटते


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : जिकडे तिकडे चोहीकडे धुके, धुके आणि सोबत गुलाबी थंडी. धुक्यात हरवलेली झाडी निसर्ग हे निसर्गाचे मनमोहक रूप डोळ्यात साठवून ठेवण्याची इच्छा प्रत्येक पर्यटकांच्या मनात तयार होईल, अशीच काहीशी परिस्थिती आता संगमनेरमध्ये तयार झाली आहे. आपण संगममेरमध्ये आहोत की महाबळेश्वर की काश्मीर असाच प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. Sangamner taluka lost in fog ..!; Kashmir, Tourists feel like coming to Mahabaleshwar



निसर्गाचे हे सौंदर्य सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. परंतु हे धुक्याचे वातावरण शेतकऱ्यांच्या पिकांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेले भांडवल सुद्धा अशा वातावरणाने वसूल होणार नाही. सरकार सोबत निसर्ग शेतकऱ्याची परीक्षा घेत आहे. निसर्गाने काहीतरी कृपा करावी आणि आमचे शेतमाल जोमात यावेत अशी भावना शेतकरी वर्गातून येत आहे.मात्र या धुक्यासह पडलेल्या गुलाबी थंडीमुळे संगमनेरचे महाबळेश्वर झाल्याचे दिसते आहे.

Sangamner taluka lost in fog ..!; Kashmir, Tourists feel like coming to Mahabaleshwar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात