WATCH : गुलाबी थंडीत रंगत आहेत हुर्डा पार्ट्या बीडमध्ये पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार


 

बीड — थंडी वाढताच वेध लागतात ते म्हणजे हुर्डा पार्टीचे, गुलाबी थंडीत हुर्डा खाण्याची मजा काही औरच असते, अशाच एका हुर्डा पार्टीत आपण जाणार आहोत. ज्याठिकाणी गप्पा, मनोरंजन, लहानग्यांचे खेळ आणि बरंच काही, चला तर मग.शेतातील ज्वारी बहारात आली की खवय्यांना वेध लागतात ते म्हणजे हुर्डा पार्टीचे, गुलाबी थंडीत सध्या हुर्डा पार्टीची रेलचेल सुरू आहे.

चुलीवरच्या गरमा गरम बाजरीच्या भाकऱ्या, पिठलं, थालीपीठ, झणझणीत ठेचा अशा गावरान मेव्याची चवच न्यारी असते, अशीच एक हुर्डा पार्टी रंगली आहे. बीडबायपास जवळील हिरकणी हुर्डा केंद्रावर या ठिकाणी केवळ मराठवाडाच नाही तर इतर राज्यातील पर्यटक गर्दी करत आहेत.गरमा गरम भजी, पोहे, हरभरा असे पदार्थ देऊन पर्यटकांचे स्वागत केले जाते.

याठिकाणी मुलांच्या खेळण्याची सोय असल्यानं लहानगे देखील याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. इथला सेल्फी पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतोय, दुष्काळी बीड जिल्ह्यात हे चित्र समाधान देणार आहे.

https://youtu.be/jMqOb63i2oA

बीड शहरात राहणाऱ्या हेमा विभुते मागील तीन वर्षांपासून हिरकणी नावाने बीड शहरानजीक हुरडा पार्टी केंद्र चालवतात, त्यांच्यासह सोबतीला दहा कामगार देखील पर्यटकांच्या सेवेसाठी तत्पर असतात, वर्षातील तीन महिने हे केंद्र नियमित सुरू असते. यंदा थंडीत ओमीक्रोनचं सावट आल्यानं प्रशासनाकडून निर्बंध कडक करण्याची तयारी आहे. मात्र प्रशासनाने काही अंशी का होईना व्यवसायिकांना सूट द्यावी, अशी भावना हेमा विभुते यांनी व्यक्त केली.

गत दोन वर्षांपासून हुरडा पार्टीवर निर्बंध होते, परंतु यंदा हुरडा पार्टीचा आस्वाद घेता येत असल्यानं पर्यटक देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होताना दिसून येत आहे. तर दुष्काळी आणि दुर्गम मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात यानिमित्ताने पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत असल्यानं त्यांच्यात देखील उत्साह दिसून येतोय.

  •  गुलाबी थंडीत रंगतायत हुर्डा पार्ट्या
  •  बीडमध्ये पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार
  •  मराठवाडासह राज्यातून पर्यटक बीडला येतात
  •  ज्वारी बहारात आली की खवय्यांना वेध
  •  हुरडा पार्टीवर निर्बंध नकोत; व्यावसायिकांची मागणी

hurda parties are arranged in Beed

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात