स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त गुगलने डुडल ठेवत केले अभिवादन


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा – क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांना स्री शिक्षणासाठी मोलाची साथ देणाऱ्या फातिमा शेख त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल ठेवत त्यांना मानवंदना दिली आहे. Google greets Fatima Sheikh with doodle on her birth aniversary

जेव्हा समाज व्यवस्था स्री शिक्षणाला कडाडून विरोध करीत होती. तेव्हा फुले दाम्पत्यासोबत फातिमा शेखही स्री शिक्षणासाठी अभूतपूर्व संघर्ष करत होत्या.
फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या.जोतिराव आणि सावित्रीबाई यांनी १८४८ साली स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली. अशावेळी उस्मान शेख आणि फातिमा शेख यांनी त्यांना राहण्यासाठी आणि शाळा चालविण्यासाठी राहते घर दिले. या दाम्पत्याच्या कल्पनेने प्रेरीत होऊन उस्मान शेख यांनीही फातिमा शेख यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.

तसेच शिक्षणापासून वंचित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची प्रेरणाही दिली. त्यानंतर सावित्रीबाईंच्या बरोबरीने फातिमा शेख यांनीही शिक्षिका होण्यासाठी खूप कष्ट सोसले. मात्र, फातिमा शेख यांच्या कार्याविषयी बहुतांश लोकांना याची माहिती नाही, ही खेदजनक बाब असली तरी आज या महान स्त्रीला गुगलने दिलेली मानवंदना अभिमानास्पद आहे, असे महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शाहिना पठाण यांनी सांगितले.

Google greets Fatima Sheikh with doodle on her birth aniversary

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*