दुबईतून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईन सक्तीचे ; ओमायक्रॉनच्या पार्श्भूमीवर राज्य सरकारचा कठोर नियम


ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे.Mandatory quarantine for passengers arriving from Dubai; Strict rule of the state government on the background of Omaicron


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.दरम्यान ओमायक्रॉनचा धोका असलेल्या 12 देशांची यादी भारत सरकारने तयार केली आहे. या 12 देशातील प्रवासी अनेकदा दुबईमार्गे आपल्या पुढील प्रवासाला जात असतात. दरम्यान एकमेकांशी संपर्क आल्याने ओमायक्रॉनचा संसर्ग जास्त वाढतो.

त्यामुळे दुबईहून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे.



ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नियम कठोर

)सात दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे .
२) दुबईतून आलेल्या प्रवाशांना सार्वजनिक परिवहन सेवा वापरता येणार नाही.
)या प्रवाशांची प्रवासाची सोय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जावी.
)विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी केली नाही तरी पुढील सात दिवस त्यांच्याशी मुंबईपालिकेच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षामार्फत संपर्क ठेवला जाणार.
)सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार
)प्रवासी बाधित नसला तरी त्याला पुढील सात दिवस सतर्क राहावे लागणार असून जर प्रवासी बाधित आढळला तर त्याला क्वारंटाईन केले जाणार.
)दुबईहून मुंबई विमानतळावर उतरलेल्या पण महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवाशांशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समन्वय साधला जाणार.

Mandatory quarantine for passengers arriving from Dubai; Strict rule of the state government on the background of Omaicron

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती