मराठवाड्यामध्ये ओमायक्रॉनची दहशत ; लातुरामध्ये दुबईतून आला पहिला रुग्ण


विशेष प्रतिनिधी

लातूर : संपूर्ण जगात ओमायक्रॉनने दहशत पसरली असून मराठवाड्यात ओमायक्रॉनने एंट्री केली असून दुबईतून आलेला पहिला रुग्ण लातुरात आढळला आहे. तो औसा येथील रुग्ण असून त्याची प्रकृती चांगली आहे. यास आरोग्य प्रशासनाने दुजोरा दिला आहे. Omycron terror in Marathwada; The first patient from Dubai came to Latura

उस्मानाबादमध्ये ही असाच दुबई रिटर्न रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आला असून त्याचा जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीसाठी पाठवला असून अद्याप रिपोर्ट न आल्याने उस्मानाबादकरांचाही जीव टांगणीला लागला आहे.



लातुर जिल्ह्यात आजतागायत ९४ पेक्षा अधिक नागरिक विविध देशातून लातुर जिल्ह्यातील विविध भागात आलेले आहेत .आरोग्य विभागाच्यावतीने या प्रवाश्याची RTPCR कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आजतागायत चाचणी केलेल्या नागरिकांपैकी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्याचे ओमायक्रॉन प्रकाराचा आहे का ?याची पडताळणी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सीगसाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले असून त्या दोन रुग्णापैकी दुबई येथून आलेला औसातील रुग्णाला ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे.

यावर लातुर येथल्या पुरणमल लाहोटी कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असल्याची माहिती लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये,कोरोना नियमांचं पालन करावे आणि लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले आहे. उस्मानाबाद येथील बावी येथे दुबईहून आलेल्या पॉझिटीव्ह रूग्णाच्या रिपोर्टकडे उस्मानाबादकरांचे लक्ष लागले आहे .

Omycron terror in Marathwada; The first patient from Dubai came to Latura

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात