अनिल देशमुखांनी बारमालकांकडून खंडणी उकळण्यास सांगितलं होतं का? कोर्टात सचिन वाझेंनी दिले हे उत्तर


 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी प्रकरणामुळे कोठडीत आहेत. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर मुंबईतील बार-रेस्तराँमधून दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. चांदिवाल आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांनी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेले अधिकारी सचिन वाझे यांची उलटतपासणी केली. मात्र, वकिलांच्या प्रश्नांना वाझेंनी दिलेल्या उत्तरामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.Did Anil Deshmukh ask to Take ransom From the bar owners? This was the answer given by Sachin Waze in court


प्रतिनिधी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख खंडणी प्रकरणामुळे कोठडीत आहेत. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर मुंबईतील बार-रेस्तराँमधून दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. चांदिवाल आयोगासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांनी पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेले अधिकारी सचिन वाझे यांची उलटतपासणी केली. मात्र, वकिलांच्या प्रश्नांना वाझेंनी दिलेल्या उत्तरामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.


अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल


देशभरात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या या वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोग स्थापन केला. एनआयएनेही याप्रकरणी सचिन वाझेला अटक केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी वाझेला ताब्यात घेतलं. देशमुखांच्या वकिलांनी यापूर्वीही सचिन वाझेची उलटतपासणी केली होती. आज याप्रकरणी पुन्हा सुनावणी झाली. यावेळी वकिलांनी सचिन वाझेंना प्रश्न विचारला की, अनिल देशमुख यांच्याकडून किंवा शासकीय अधिकाऱ्याकडून कोणती मागणी करण्यात आली होती का? यावर वाझेंनी ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यानंतर देशमुखांकडून किंवा त्यांच्या संबंधित अधिकृत व्यक्तीकडून पैशांची मागणी झाली होती का? असा प्रश्न विचारला. यावर वाझेनी ‘नाही’ असे उत्तर दिले. यानंतर आता उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. देशमुखांच्या वकिलांनी विचारले की, अनिल देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातून बारमालकांकडून पैसे उकळण्यास करण्यास सांगितले होते का? वाझेंनी उत्तर दिले की, मला आठवत नाही! यानंतर तुम्ही बार मालकांकडून पैसे उकळलेत का? असा प्रश्न विचारल्यावर वाझे उत्तरादाखल नाही असं म्हणाले.

दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. चांदीवाल आयोगाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना वकिलांना भेटण्यासाठी परवानगी देत १६ डिसेंबर ही तारीख दिली असून तर वाझेंना वकिलांना भेटण्यासाठी २० डिसेंबर तारीख दिली आहे.

Did Anil Deshmukh ask to Take ransom From the bar owners? This was the answer given by Sachin Waze in court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात