मोदींचे concentration; विरोधकांचे frustration…!!


गेल्या काही दिवसांनी मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय हालचाली बघितल्या आणि विरोधक त्यांना देत असलेला शेलका प्रतिसाद बघितला की मोदींचे concentration आणि विरोधकांचे frustration या शीर्षकातील आशयाची प्रचिती येईल…!! Modi’s concentration; Opposition frustration …!!

गेला आठवडाभर मोदींच्या काशी दौऱ्याची मिडियामध्ये चर्चा होती. काशी विश्वनाथ कॉरिडोर मध्ये काय झाले आहे?, काय होणार आहे?, तिथला पंतप्रधानांचा कार्यक्रम नेमका कसा आहे?, महिनाभर काशी विश्वनाथ कॉरिडोर मध्ये कोण कोणती संमेलने होणार आहेत?, याची चर्चा मीडिया मध्ये होती.

त्याच वेळी सर्व विरोधी पक्षांच्या हालचाली संसदीय पातळीवर राज्यसभेच्या 12 खासदार यांचे निलंबन मागे घेण्यावरून concentrate झाल्या होत्या. तशा हालचाली आजही सुरू आहेत, पण दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी, “मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. देशात हिंदूंचे राज्य आणायचे आहे. हिंदुत्ववाद्यांचे घालवायचे आहे,” असे वक्तव्य केले. त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात जोरदार उमटले. पण राहुल गांधींना आपण हिंदू आहोत हे काय सांगावे लागले? याची चर्चा फारशी कोणी केली नाही…!!त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी गोव्यात स्वतःच्या तृणमूळ काँग्रेसची व्याख्याच बदलून टाकली. TMC म्हणजे टेम्पल, मशीद आणि चर्च पार्टी असे सांगून त्यांनी स्वतःची धर्मनिरपेक्षता जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी गोव्यात नुसती काँग्रेसचा फोडली नाही, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील संपवून टाकली. राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांचे राजकीय frustration असे बाहेर येत असताना अखिलेश यादव यांनी त्या दोन्ही नेत्यांवर वरकडी केली आहे. “माणसे शेवटच्या दिवसांमध्ये काशीमध्ये येतात”, अशी अश्लाघ्य टीका त्यांनी मोदींवर करून घेतली आहे.

मोदींनी काशी विश्वनाथ मंदिराचे 3000 वर्ग मीटरचे रूपांतर 51000 वर्ग मीटर मध्ये केले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोर एकूण 5 लाख वर्ग मीटरचा होणार आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम वेगात सुरू झाले आहे. अशा वेळी अखिलेश यादव हे, “माणसे शेवटच्या काळात काशीमध्ये येतात,”असे म्हणून मोकळे झाले आहेत. हा त्यांच्या frustration चा कळस आहे…!! टीका करायला कोणते साधन उरले नाही, मुद्देच उरले नाहीत आणि राजकीय भवितव्याची आशाही शिल्लक राहिली नाही की अशी आदळआपट सुरु होते. आपल्या राजकीय शेवटच्या ऐवजी लोक इतरांच्या शेवटाचा विचार करायला लागतात…!!

राहुल गांधी, ममता बॅनर्जी किंवा अखिलेश यादव यांना मोदींनी अजिबात तोंड उत्तर दिले नाही. ते फक्त आपल्या पद्धतीने आणि आपल्या गतीने काम करत राहिले आहेत. मोदींचे हे कामावरचे concentration आहे आणि त्यामुळेच विरोधकांचे frustration वेगवेगळ्या “शब्द फुलांनी” बाहेर येत आहे…!!

आजही मोदी हे भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत आहेत. फक्त काशी विश्वनाथ कॉरिडॉरचाच विकास करायचा नाही, तर बाकीच्या राज्यांमध्येही त्याचीच विकासात्मक प्रतिकृती कशी करता येईल, यावर विचारमंथन सुरू आहे. मोदींचे आपल्या पद्धतीने काम करण्यावर जसे concentration वाढेल, तसे विरोधकांचे frustration अधिकाधिक वाढत जाणार आहे. मोदी हे अधिकाधिक concentration ने काम करत राहतील आणि विरोधक जास्तीत जास्त frustrate होऊन बेताल बडबड करत पळत सुटतील, अशी भारतीय राजकारणाची आज स्थिती येऊन ठेपली आहे…!!

Modi’s concentration; Opposition frustration …!!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था