लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली दिलासादायक माहिती


‘हर घर दस्तक’ अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे.’50% of the population eligible for vaccination has been vaccinated; Reassuring information given by Union Health Minister Mansukh Mandavia


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगात कोरोनाने हाहाकार माजविला होता. कोरोनाची लाट ओसरली नाही तोच यात अजून एका नव्या व्हेरिएंटची भर पडली आहे.दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जो तो देश आपापल्या पद्धतीने या व्हेरिएंपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते खबरदारीची पावले उचलत आहेत. दरम्यान भारतामध्ये या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले.आज(५ डिसें.) ओमिक्रॉनचा पाचवा रुग्ण भारतात सापडला आहे.


देशात कोरोना नियंत्रणात, ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया


दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासादायक माहिती दिली आहे.मंडाविया म्हणाले की, लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे.’ ‘हर घर दस्तक’ अभियान संपूर्ण वेगात सुरू आहे. जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली नवी उंची गाठत आहे.’

तसेच मिळालेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये १ कोटी ४ लाख १८ हजार ७०७ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत १२७.६१ कोटी डोस दिले गेले आहेत.दरम्यान, पुढे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की,’काल(४ डिसें.)देशात १ कोटीहून अधिक डोस देण्यात आले.

50% of the population eligible for vaccination has been vaccinated; Reassuring information given by Union Health Minister Mansukh Mandavia

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात