महाराष्ट्र सरकारकडून ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरसाठी ७,५०० कोटींची जागतिक निविदा, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती

Maharashtra govt floats global tender to procure 10 lakh Remdesivir vials & oxygen

Maharashtra govt floats global tender : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन तसेच वैद्यकीय उपकरणांसबंधित जागतिक निविदा काढली आहे. महाराष्ट्रासाठी 10 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या कुप्या, 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत ही निविदा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना ही माहिती दिली. Maharashtra govt floats global tender to procure 10 lakh Remdesivir vials & oxygen


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर व ऑक्सिजन तसेच वैद्यकीय उपकरणांसबंधित जागतिक निविदा काढली आहे. महाराष्ट्रासाठी 10 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या कुप्या, 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 25 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत ही निविदा आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना ही माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले की, निविदा भरण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. जागतिक निविदेद्वारे 10 लाख रेमडेसिव्हिर कुप्या, 40 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 132 पीएसए प्लांट्स, 25 हजार मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि आपत्कालीन परिस्थितीकरिता साठवून ठेवण्यासाठी 27 ऑक्सिजन आयएसओ टँक्सची मागणी करण्यात आली आहे. या निविदेचा अंदाजित खर्च सात हजार पाचशे कोटी रुपये असणार आहे.

या निविदेसंबंधी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्रिसदस्यीय समितीला देण्यात आले आहेत. शासनाने ही निविदा भरण्याकरिता तीन दिवसांचा कालावधी दिला असून इच्छुक आपले दर या काळात नोंदवू शकतात. तुम्ही याला पुरवठादारांच्या अपेक्षा जाणून घेण्याचे कुतूहलही म्हणू शकता, असेही मंत्री टोपे म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या कोरोना संकटाच्या काळात रुग्णांवर उपचारांसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मोठी मागणी आहे. सोमवारी राज्यात 48,700 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. याबरोबरच राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 43,43,727 वर गेला आहे. तर एका दिवसात 524 मृत्यूंमुळे एकूण मृतांची संख्या 65,284 वर गेली आहे.

Maharashtra govt floats global tender to procure 10 lakh Remdesivir vials & oxygen

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात