‘तुम्हाला सांभाळता येत नसेल तर तसे सांगा, आम्ही केंद्राला सांगू’; दिल्ली हायकोर्टाने केजरीवाल सरकारला फटाकारले

If you can't handle it, say so, we will tell the center'; Delhi HC Slams Kejriwal government

Delhi HC Slams Kejriwal government : मंगळवारी कोरोना संकटावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील केजरीवाल सरकारची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. कोर्ट म्हणाले की, तुम्हाला कोरोनाची स्थिती हाताळता येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही केंद्र सरकारला सांगू. राज्य सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी कोर्टाला म्हटले की, दिल्ली सरकारने या समस्यांवर उपाय करण्यासाठी वेगळे पोर्टल बनवले आहे. कोर्टाने म्हटले की, जर कोणत्याही ऑक्सिजन रिफिलर, सप्लायर आणि इतरांनी दिल्ली सरकारच्या पोर्टलवर आपला स्टॉक उपलब्ध केला नाही, तर सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. If you can’t handle corona situation, say so, we will tell the center’; Delhi HC Slams Kejriwal government


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मंगळवारी कोरोना संकटावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीतील केजरीवाल सरकारची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. कोर्ट म्हणाले की, तुम्हाला कोरोनाची स्थिती हाताळता येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही केंद्र सरकारला सांगू. राज्य सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी कोर्टाला म्हटले की, दिल्ली सरकारने या समस्यांवर उपाय करण्यासाठी वेगळे पोर्टल बनवले आहे. कोर्टाने म्हटले की, जर कोणत्याही ऑक्सिजन रिफिलर, सप्लायर आणि इतरांनी दिल्ली सरकारच्या पोर्टलवर आपला स्टॉक उपलब्ध केला नाही, तर सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल.

कोर्टाने म्हटले की, कोरोनाच्या उपचारांत वापरले जाणारे औषध रेमडेसिव्हिर आणि डेक्सामेथासोनच्या उपलब्धतेविषयी आणि काळ्या बाजाराचा मुद्दाही आमच्यासमोर आला आहे. कोणत्याही ग्राहकाला औषधी काळ्या बाजारातून मिळता कामा नये. औषधी पुरवठा साखळीत असली पाहिजेत. सरकारने म्हटले की, रुग्णालयांत वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही तसा आदेश जारी करू शकतो.

कोर्टाकडून मृत्यूंच्या कारणांबद्दल चौकशीचे आदेश

सुनावणीदरम्यान ऑनलाइन पोर्टलवर रिअल टाइममध्ये माहिती देण्यास आम्हाला चांगली सूचना मिळाल्याचे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या पुरवठ्याचे ऑडिट करण्याचे आदेश कोर्टाने दिल्ली सरकारला सर्व फार्मसीमधून दिले आहेत. यामुळे कोण काळा बाजार करतंय ते पुढे येईल.

आदेश न मानणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे अधिग्रण करा…

दिल्ली हायकोर्टाने कठोर टीका केल्यानंतर अनेक रुग्णालयांनी ऑक्सिजनचा अभाव असल्याचे सांगितले. ऑक्सिजन रिफिलर्ससाठी योग्य सूचना न दिल्याबद्दल कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले आहे. आमच्या (कोर्टा) आदेशानंतरही सुनावणीला हजेरी न लावणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे अधिग्रहण करण्यास उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला सांगितले आहे. अशा ऑक्सिजन रिफिलर्सवर अवमानना कारवाई करण्याचा इशारा हायकोर्टाने दिला आहे.

If you can’t handle corona situation, say so, we will tell the center’; Delhi HC Slams Kejriwal government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात