पंजाबातील शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने उजळले, पहिल्यांदाच MSPवर आधारित तब्बल ८,१८० कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा

Punjab farmers received Rs 8,180 crore MSP payment via DBT this year

Punjab farmers : पंजाबच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच आपल्या गव्हाच्या विक्रीसाठी एमएसपीवर पेमेंट थेट बँक खात्यात मिळत आहे. जवळपास 8,180 कोटी रुपये या वर्षभरात ट्रान्सफर झाले आहेत. केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी याविषयी माहिती दिली. याबरोबरच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर आधारित आपल्याची मालाची अप्रत्यक्ष पेमेंट मिळण्याऐवजी थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याने नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. Punjab farmers received Rs 8,180 crore MSP payment via DBT this year


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच आपल्या गव्हाच्या विक्रीसाठी एमएसपीवर पेमेंट थेट बँक खात्यात मिळत आहे. जवळपास 8,180 कोटी रुपये या वर्षभरात ट्रान्सफर झाले आहेत. केंद्रीय अन्न मंत्रालयाने सोमवारी याविषयी माहिती दिली. याबरोबरच पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर आधारित आपल्याची मालाची अप्रत्यक्ष पेमेंट मिळण्याऐवजी थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्याने नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.

2021-22 च्या सध्याच्या रब्बी हंगामात भारत सरकारने सध्याच्या एमएसपी योजनेनुसार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीवर रब्बी पिकाची खरेदी सुरू केली आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंदिगड, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच इतर राज्यांतून व केंद्र शासित प्रदेशांतून गव्हाची खरेदी वेगवान सुरू आहे. 25 एप्रिल 2021 पर्यंत 222.33 एलएमटी (लाख मेट्रिक टन) हून अधिक खरेदी झालेली आहे. तर गतवर्षी याच कालावधीत 77.57 लाख मेट्रिक टन पिकाची खरेदी करण्यात आली होती.

25 एप्रिल 2021 पर्यंत 222.33 लाख मेट्रिक टन एकूण खरेदीपैकी पंजाब – 84.15 लाख मेट्रिक टन (37.8 टक्के), हरियाणा- 71.76 लाख मेट्रिक टन (32.27 टक्के) आणि मध्य प्रदेश – 51.57 लाख मेट्रिक टन (23.2 टक्के) यांनी प्रमुख योगदान दिले आहे.

तब्बल 21.17 लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच 43,912 कोटी रुपयांच्या एमएसपी मूल्यासह सध्याच्या रब्बी हंगामातही खरेदी अभियानाद्वारे लाभान्वित करण्यात आले आहे.

25 एप्रिल 2021 पर्यंत पंजाबमध्ये तब्बल 8180 कोटी रुपये आणि हरियाणात तब्बल 4,668 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहे.

या वर्षी सार्वजनिक खरेदीच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली जेव्हा हरियाणा आणि पंजाबने एमएसपीच्या अप्रत्यक्ष पेमेंटची पद्धत सोडून भारत सरकारतर्फे निर्देशित सर्व खरेदी केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना बँक खात्यात ऑनलाइन पैसे पाठवण्यास सुरुवात झाली. यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी खूप खुश आहेत. कारण “वन नेशन, वन एमएसपी, वन डीबीटी” अंतर्गत पहिल्यांदा त्यांना कोणताही विलंब न होता, कोणतीही काट-छाट न होता थेट लाभ मिळत आहे.

Punjab farmers received Rs 8,180 crore MSP payment via DBT this year

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात